ज्या पेगाससवर संसदेत रान उठलंय, ते नेमकं आहे काय, नेमकी हेरगिरी कशी केली जाते? वाचा सविस्तर

जासूसीसाठी किंवा हेरगिरीसाठी पेगाससचाच वापर का? तर त्याचं कारण आहे त्याची क्वालिटी. पेगासस एकदा इन्स्टॉल झालं तर फोनमध्ये तो स्वत:च्या कुठल्याच पाऊलखुणा सोडत नाही. म्हणजेच त्याच्या असण्याचा पुरावा मिळत नाही

ज्या पेगाससवर संसदेत रान उठलंय, ते नेमकं आहे काय, नेमकी हेरगिरी कशी केली जाते? वाचा सविस्तर
Pegasus : पेगासस म्हणजे नेमके काय? हे काय आणि कसे कार्य करते?
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 2:13 PM

300 भारतीयांची केंद्र सरकारनेच जासूसी केल्याचा आरोप होतोय. यात 40 पेक्षा जास्त पत्रकार आहेत तर जजेस, उद्योगपती यांचीही हेरगिरी केल्याचं वृत्त एका न्यूज पोर्टलनं दिलेलं आहे. याच मुद्यावर आज संसदेत गदारोळ झाला. ह्या सगळ्या घटनाक्रमाच्या केंद्रस्थानी आहे ते इस्त्रायली सॉफ्टवेअर पेगासस. (Pegasus)पण हे सॉफ्टवेअर नेमकं कसं काम करतं, सामान्य नागरिकांसाठी ते उपलब्ध आहे का हे जाणून घेऊया.

सामान्यांना वापरण्यासाठी उपलब्ध आहे? पेगासस हे एक इस्त्रायली सॉफ्टवेअर आहे. जासूसी करण्यासाठी त्याचा अनेक देशांनी वापर केल्याचं आता उघड होतंय. NSO ह्या इस्त्रायली कंपनीनं त्याला तयार केलय आणि ते फक्त सरकार किंवा सरकारी संस्थानाच वापर करण्यासाठी कंपनी विकते. याचाच अर्थ असा की, सामान्य नागरिकांना वापरण्यासाठी ते उपलब्ध नाही.

पेगासस काम कसं करतं? ज्याच्या फोनला हॅक करायचं असतं त्याच्यात पेगासस इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. त्यातला एक मार्ग असाही आहे की, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. जसही त्या लिंकवर यूजर क्लिक करतो, पेगासस आपोआप इन्स्टॉल होतं.

व्हॉटस अपमध्ये कसं इन्स्टॉल होतं? 2019 ला हॅकर्सनी व्हाटस अपचा वापर करुन फोनध्ये पेगासस इन्स्टॉल केलं होतं, त्यावेळेस एक वेगळीच पद्धत अवलंबली होती. त्यावेळेस हॅकर्सनी व्हॉटस अपच्या व्हीडीओ कॉल फिचरमध्ये एक उणीव(BUG) शोधून काढली आणि त्याचाच फायदा घेत हॅकर्सनी नकली व्हाटस अप अकाऊंटवरुन टार्गेटवर असलेल्या फोनवर व्हीडीओ कॉल केले. त्याच दरम्यान एका कोडद्वारे पेगाससला फोनमध्ये इन्स्टॉल केलं.

पेगासस नेमकी कोणती माहिती चोरतं? एकदा का पेगासस तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केलं तर हॅकर्स तुमच्या फोनला कमांड देऊ शकतात. तुमच्या फोनवर हॅकर्सचं नियंत्रण येतं. त्यातून त्यांना हवी ती माहिती ते मिळवू शकतात. त्यात तुमचा पासवर्ड नंबर, कॉनटॅक्ट नंबर, तुमचं लोकेशन, कॉल्स, मेसेज सगळं ते पाहू शकतात, ऐकू शकतात, वाचू शकतात. एवढच नाही तर तुमच्या फोनचा कॅमेरा, माईक यालाही हॅकर्स त्यांना वाटेल तेव्हा चालू करु शकतात. तुमचं रियल टाईम लोकेशन त्यांना सहज मिळू शकतं.

  • फोनच्याच माध्यमातून मग हॅकर्स तुमचे ई मेल, SMS,नेटवर्क डिटेल्स, तुमच्या फोनची सेटींग, तुमच्या फोनची ब्राऊझिंग हिस्ट्री अशी सगळी माहिती मिळवू शकतात. म्हणजेच एकदा का तुमच्या फोनमध्ये पेगासस इन्स्टॉल झाला तर तुमची सगळी माहिती हॅकर्सना सहज उपलब्ध होते.

पेगासस एवढं फेमस का आहे? जासूसीसाठी किंवा हेरगिरीसाठी पेगाससचाच वापर का? तर त्याचं कारण आहे त्याची क्वालिटी. पेगासस एकदा इन्स्टॉल झालं तर फोनमध्ये तो स्वत:च्या कुठल्याच पाऊलखुणा सोडत नाही. म्हणजेच त्याच्या असण्याचा पुरावा मिळत नाही.

  • हा कमी बँडविथवर काम करु शकतो. त्यासाठी फोनची बॅटरीही फार खात नाही, मेमरी, त्यातला डेटा यालाही तो फार संपवत नाही, त्यामुळे त्याचा संशय येत नाही. त्यातूनच मग फोन हॅक होतोय हेच कळत नाही.
  • अँड्रॉईडच्या तुलनेत जास्त सुरक्षित मानला जातो आयफोनचा iOS लाही पेगासस हॅक करु शकतो.
  • तुम्ही फोन जरी लॉक केला तरी पेगाससवर त्याचा फरक पडत नाही. तो आपलं काम करत रहातो. (What exactly is the Pegasus, how it works, how spying done by using Pegasus know all in Marathi )

300 भारतीयांची सरकारकडूनच हेरगिरी, 40 पत्रकारांचा समावेश, केंद्र सरकार म्हणतं आरोप निराधार, वाचा सविस्तर काय घडतंय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.