मुलाला संपत्ती तर मुलीला प्रियकरासोबत लग्न, विरोध करणाऱ्या बापासोबत भयानक कृत्य !
उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात भयानक घटना समोर आली आहे (Daughter and Son killed father for property in UP).
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात भयानक घटना समोर आली आहे. एका तरुणाला त्याची वडिलोपार्जित संपत्ती हवी होती. तर त्याच्या बहिणीला प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. मात्र, दोघांना तसं करता येत नव्हतं. कारण दोघांचे वडील सुनील कुमार हे त्यामध्ये आडकाठी आणत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांचाच काटा काढण्याचं ठरवलं. दोघांनी मिळून षडयंत्र रचत आपल्या वडिलांना संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे (Daughter and Son killed father for property in UP).
नेमकं काय घडलं?
आरोपी बहीण-भावाने 26 मार्च रोजी रात्री आपल्या वडिलांची हत्या केली. विशेष म्हणजे या कृत्यासाठी मुलीला तिच्या प्रियकराने तर मुलाला त्याच्या मित्रांनी मदत केली. आरोपींनी मृतक सुनील कुमार यांना प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला (Daughter and Son killed father for property in UP).
आरोपींचा शेजारच्यांवर खोटा आरोप
विशेष म्हणजे वडिलांची हत्या केल्यानंतर दोघं भावा-बहिणीने स्वत:चा गुन्हा लपवण्यासाठी शेजारच्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असताना आरोपी हे सुनील कुमार यांच्या घराचे शेजारचे नसून त्यांचे मुलं आहेत, असं समोर आलं. पोलिसांनी आरोपी बहीण-भाऊ आणि त्यांच्या मित्रांना अटक केली.
पोलिसांच्या तपासात अनेक बाबी उघड
पोलिसांना तपासात अनेक गोष्टी समजल्या. मृतक सुनील कुमार आपली संपत्ती विकून आपले मौज करायचा. हीच बाब त्याच्या मुलांना आवडायची नाही. सुनील कुमारने नुकतंच 20 लाखात शेती विकली होती. त्याच्या या व्यवहाराला विरोध केला म्हणून त्याने मुलगा आणि मुलीसोबत वाद घातला होता. या वादाचं रुपांतर हाणामारीतही झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. या घटनेनंतर दोघी भावंडांनी आपल्या वडिलाचीच हत्या करण्याचं ठरवलं.
चारही आरोपींना बेड्या
पोलिसांना मृतक सुनील कुमारती पत्नी आशा देवी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या जबाबानंतर पोलिसांनी सर्व गोष्टींची शाहनिशा केली. त्यानंतर पोलीस एका निष्कर्षावर आले आणि त्यांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. याप्रकरणाचा पुढील तपास अजून सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा : जुळलेल्या लग्नात नवरदेवाकडूनच विरजण, आधी नवरीवर बंधनं घातली, नंतर सासरच्या मंडळींवर गोळीबार