Murder | सासूच्या जीवावर उठली सून, निवृत्त जेलरचं रिव्हॉल्वर चोरून सुनेनं केला खून

Murder : 21 जानेवारी रोजी सरोज यांनी आपल्या शेजारी राहमाऱ्या निवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर यांची रिव्हॉल्वर चोरली होती. रिव्हॉल्वर चोरीला गेल्याचं कळल्यानंतर याबाबत तक्रारही देण्यात आली होती.

Murder | सासूच्या जीवावर उठली सून, निवृत्त जेलरचं रिव्हॉल्वर चोरून सुनेनं केला खून
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:38 AM

यवतमाळ : एका 28 वर्षांच्या सुनेनं आपल्या 68 वर्षांच्या सासूची गोळ्या झाडून हत्या (Murder) केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या आर्णी (Aarni, Yavatmal) इथं घडलेल्या या घटनेनं सगळेच हादरुन गेले आहेत. शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सुनेनं आधी रिव्हॉल्वर चोरली. यानंतर आपल्याच सासूची गोळ्या झाडून सुनेनं हत्या केली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सासूनं जागीच जीव सोडल्याचं उघडकसी आलं असून हत्या करणाऱ्या सुनेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी आता अधिक पोलिस तपास सुरु असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आशा किसनराव पोरजवार असं मृत सासूचं नाव असून त्यांच्या सूनेचं नाव सरोज अरविंद पोरजवार (Saroj Arvind Porajwar) असं आहे. अत्यंत गरीब असलेल्या पोरजावर कुटुंबातील सासू सुनेत सातत्यानं खटके उडायचे.

नेमकं हत्येचं कारण काय?

21 जानेवारी रोजी सरोज यांनी आपल्या शेजारी राहमाऱ्या निवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर यांची रिव्हॉल्वर चोरली होती. रिव्हॉल्वर चोरीला गेल्याचं कळल्यानंतर याबाबत तक्रारही देण्यात आली होती. आर्णी पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीनंतरही कुणालाच रिव्हॉल्वर सापडलं नव्हतं. हत्या करणाऱ्या सरोज यांनी तब्बल चार दिवस हे रिव्हॉल्वर लपवून ठेवलं होतं. घरातच रिव्हॉल्वर लवून ठेवल्यानंतर योग्य वेळ पाहून सरोज पोरजवार यांनी आपल्याच सासूचा खून केलाय.

आशा पोरजवार यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा अरविंद हा देखील भाजीचा व्यवसाय करत होता. दोघं मिळून भाजीचा व्यवसाय सांभाळायचे. तर दुसरा मुलगा हा नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लग्नानंतर अरविंद यांची पत्नी सरोज यांच्यामध्ये आणि अरविंद यांची आई आशा यांच्यात सातत्यानं वाद व्हायचे. घरगुती कारणावरुन सुरु असलेल्या वादातून अखेर सुनेंनंच सासूचा खून करण्याचा टोकाचा फक्त निर्णयच घेतला नाही, तर खरोखरच आपल्या सासूचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अधिक चौकशी सुरु

सासूवर गोळ्या झाडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सासूचा मृतदेह पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. याप्रकरणी अखेर पोलिसांनीही कारवाई करत हत्या करण्याच्या आरोपाखाली सुनेला ताब्यात घेतलं आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरु असून या हत्येमागे घरगुती कारणाव्यतिरीक्त आणखी काही कारणं आहेत का, याचा शोध घेतला जातो आहेत. मात्र या घटनेनं संपूर्ण यवतमाळ हादरुन गेलं आहे.

संबंधित बातम्या :

डोंगर पोखरून गारगोटीची तस्करी, थेट चीनपर्यंत विक्री, जालन्यातल्या हिरवट निळ्या दगडांचं महत्त्व आहे तरी काय?

उल्हासनगरात दुकानं फोडत व्यापाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

आधी पत्नीचा गळा आवळला, मग आत्महत्या दर्शवण्यासाठी पंख्याला लटकवले

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.