संपत्तीचा हव्यास, जन्मदात्याचाच घात; पश्चिम बंगालमध्ये डोक्यात वीट घालून मुलीकडून पित्याची हत्या
नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी केया आणि कालीपद यांच्या संपत्तीवरुन भांडण झाले. यानंतर कालीपद हे अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले. त्यावेळी केयाही त्यांच्या पाठोपाठ बाथरुममध्ये गेली आणि आपल्या डोक्यात जड वस्तू घालून वार केला. यात कालीपद यांचा मृत्यू झाला.
कोलकाता : संपत्तीच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीनेच आपल्या बापाच्या डोक्यात वीट घालत हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यात घडली आहे. कालीपाद दास(83) असे मयत बापाचे तर केया दास(40) असे आरोपी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर केयाचा मुलगा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संपत्तीवरुन बाप-लेकीत सुरु होता वाद
आरोपी केया दास हिचा घटस्फोट झाला असून सध्या ती हुगळी जिल्ह्यातील उत्तरपारा भद्रकाली येथील प्रशांत दत्ता सरानी भागातील वडिलांच्या घरी आपल्या मुलासोबत राहत आहे. मुलीचा बापाच्या संपत्तीवर डोळा होता. केयाचा वडिलांसोबत संपत्तीवरुन वाद सुरु होता. यातूनच दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी केया आणि कालीपद यांच्या संपत्तीवरुन भांडण झाले. यानंतर कालीपद हे अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले. त्यावेळी केयाही त्यांच्या पाठोपाठ बाथरुममध्ये गेली आणि आपल्या डोक्यात जड वस्तू घालून वार केला. यात कालीपद यांचा मृत्यू झाला. कालीपद दास हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते.
संपत्तीच्या लालसेपोटी जन्मदात्याची हत्या
घटनेची माहिती मिळताच उत्तरपारा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथे बाथरूममध्ये कालीपाद यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. केयाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चंदननगर पोलीस आयुक्तालयाचे डीसीपी डॉ. अरविंद आनंद यांनी सांगितले की, मुलीचा वडिलांसोबत मालमत्तेचा वाद सुरू होता, त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढला. तर केयाचा मुलगा अभिषेक अधिकारी घटनेनंतर फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच उत्तरपारा-कोटरंग नगरपालिकेचे प्रशासक दिलीप यादव घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटित केया आपल्या मुलासोबत वडिलांच्या घरी राहत होती आणि त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. (Daughter kills her aged father for property in West Bengal)