Dawood Ibrahim | डोंगरीच्या गल्ली बोळातून भाई बनलेल्या दाऊद इब्राहिम कासकरचा पहिला दुश्मन कोण?

Dawood Ibrahim | त्या एका हत्येनंतर दाऊद बनला मुंबई अंडरवर्ल्डचा डॉन. एकवेळ मुंबईमध्ये दाऊद इब्राहिमच्या नावाची दहशत होती. पाकिस्तानात असलेल्या दाऊदवर विषप्रयोग झाल्याच वृत्त आहे. दाऊदची प्रकृती गंभीर असल्याच बोलल जातय.

Dawood Ibrahim | डोंगरीच्या गल्ली बोळातून भाई बनलेल्या दाऊद इब्राहिम कासकरचा पहिला दुश्मन कोण?
पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादला त्याच्या घरातच कैद करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमला विष दिल्यामुळे जावेद मियांदादवर ही कारवाई करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 10:18 AM

लाहोर : मागच्या अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम कासकर भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. भारताला हवा असलेला हा मोस्ट वाँटेड गुन्हेगार कराचीतील रुग्णालयात दाखल असल्याच्या बातम्या येत आहेत. मुंबईच्या या अंडरवर्ल्ड डॉनवर विष प्रयोग झाल्याच वृत्त आहे. दाऊदची तब्येत नाजूक असल्याच बोलल जातय. दाऊदबद्दलची कुठलीही बातमी बाहेर जाऊ नये म्हणून तिथे गूगल सर्विसेज, ट्विटर एकूणच सोशल मीडिया डाऊन करण्यात आला आहे. पाकिस्तानी पत्रकार आरजू कासमीने दाऊदची तब्येत गंभीर असल्याची माहिती दिलीय.

भारताला हव्या असलेल्या या मोस्ट वाँटेड गुन्हेगाराला पाकिस्तानने आश्रय आणि संरक्षण दोन्ही दिलं. बऱ्याच वर्षांपासून दाऊद पाकिस्तानात लपून बसलाय. मुंबईत 1993 सालची साखळी बॉम्बस्फोटाची मालिका तसच अनेक अन्य गंभीर गुन्हे दाऊदच्या नावावर आहेत. पाकिस्तानने नेहमीद दाऊच इब्राहिम त्यांच्याकडे असल्याच नाकारल. दाऊद इब्राहिमच्या गुन्ह्यांची यादी मोठी आहे.

डोंगरीच्या गल्लीबोळात भाईगिरी करणारा दाऊद मोठा कसा झाला?

दाऊद एका पोलीसवाल्याचा मुलगा. पण सुरुवातीपासूनच त्याला चुकीची संगत मिळाली. परिणामी तो गुन्हेगारीकडे वळला. डोंगरीच्या गल्लीबोळात फिरणाऱ्याने दाऊदने गुन्ह्यांची सुरुवात चोरी, दरोडा आणि तस्करीने केली. सर्वप्रथम तो डॉन करीम लाला गँगच्या संपर्कात आला. हप्ता वसुली त्यानंतर सट्टेबाजीमध्ये गुंतला. पुढे जाऊन त्याने प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली बॉलिवूड सेलिब्रिटी, निर्मात्यांकडून पैसे उकळायला सुरुवात केली. उद्योजक, इंडस्ट्रीकडून त्याने जे पैसे उकळले ते त्याने रियल एस्टेटमध्ये गुंतवले. त्यातून त्याची आर्थिक ताकत वाढत गेली.

त्या हत्येनंतर दाऊदची शपथ

1981 साली दाऊदचा मोठा भाऊ साबिर इब्राहिम कासकरची हत्या झाली. चौघांनी बेछूट गोळीबार करुन साबिरची हत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. भावाच्या हत्येनंतर दाऊदच्या डोक्यात सूडाच्या भावनेने घर केलं. पठान गँगने दाऊदच्या भावाचा गेम केला होता. त्या सगळ्यांना संपवण्याची दाऊदने शपथ घेतली होती. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात नव्या आलेल्या तरुणांना हाताशी धरुन दाऊदने पठान गँगमधील प्रत्येकाला संपवलं. पठान गँगशी दाऊदची पहिली दुश्मनी झाली. 1986 साली दाऊद मुंबईसोडून दुबईला पळून गेला. तिथे सुद्धा त्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला होता. दाऊद दुबईला निघून गेला पण मुंबईत त्याचे अनेक साथीदार सक्रीय होते.

ड्रग्जमधून कमावला पैसा

अफीम आणि ड्रग तस्करीत दाऊद इब्राहिम गँगचा हात होता. पाकिस्तानी आर्मी, इंटेलिजेंस एजेंसीच्या मदतीने दाऊदने जगाच्या वेगवेगळ्या भागात ड्रग तस्करीच नेटवर्क वाढवलं. ड्रग्जमधून सुद्धा दाऊदने भरपूर पैसा कमावला. दाऊद ऐशोआरामी लाइफस्टाइल जगतोय. पाकिस्तानलाही पैसा पुरवतोय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.