पतीच्या हत्येप्रकरणात पत्नीला फाशीची शिक्षा, प्रकरण ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल

आपल्या पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या महिलेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आरोपीवर अनेक गंभीर आरोप होते. आपल्या पतीला बाजुला करण्यासाठी तिने हत्येचा कट रचला. तिच्या मनात इतकी भंयकर योजना सुरु होती हे पतीच्या मनातही आलं नसेल.

पतीच्या हत्येप्रकरणात पत्नीला फाशीची शिक्षा, प्रकरण ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 10:06 AM

Crime news : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे अनिवासी भारतीय पतीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे. NRI पत्नीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने महिलेच्या प्रियकरालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या पत्नीने आपल्या प्रियकरासोबत काय केले हे जाणून तुम्हीही थक्क व्हाल. ही महिला आपल्या पतीसोबत परदेशातून भारतात आली होती. येथे आल्यानंतर तिने प्रियकरासह पतीची हत्या केली. यावेळी महिला आणि तिच्या प्रियकराने घरात उपस्थित असलेल्या दोन कुत्र्यांनाही विष पाजून ठार मारले होते.

NRI पतीची हत्या

हे संपूर्ण प्रकरण 1 सप्टेंबर 2016 रोजी उघडकीस आले. जेव्हा एनआरआय असलेल्या सुखजित सिंग यांचा मृतदेहएका फार्म हाऊसमध्ये आढळून आला. याशिवाय दोन पाळीव कुत्र्यांनाही विष देऊन ठार करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्तीची पत्नी रमणदीप कौर आणि तिचा प्रियकर गुरुप्रीत उर्फ ​​बिट्टू यांना अटक केली होती. मृतक, त्याची पत्नी आणि पत्नीचा प्रियकर हे तिघेही ब्रिटिश नागरिक होते. मनदीप कौरचे गुरप्रीतसोबत ब्रिटनमध्ये प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले. पतीला रस्त्यातून बाजुला करण्यासाठी तिने प्रियकरासह कट रचला.

पत्नीला फाशीची शिक्षा

न्यायालयात खटला अनेक दिवस चालला, यानंतर आता न्यायाधीशांंनी पत्नी रमणदीप कौरला फाशी आणि तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर मृत सुखजीतच्या आईने न्यायालयाचे आभार मानले आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर सरकारी वकील यांनी म्हटले की, ‘प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याने न्यायालयाने ही बाब अत्यंत गंभीरपणे घेतली होती. हे प्रकरण गंभीर असल्याचं कोर्टाने म्हटले होते. या प्रकरणात दोन्ही आरोपींनी दोषी ठरवण्यात आले होते. न्यायाधीशांनी एनआरआय पत्नी रमनदीप कौरला फाशी आणि तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.’

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.