‘या दिवशी तुझा मृत्यू’, खेडमधील मॉलमध्ये अजब प्रकार, थेट जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चिठ्ठ्या

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. मॉलमधील 20 ते 25 दुकानांसमोर इंग्लिश भाषेमध्ये जीवे ठार मारण्याचा मजकूर लिहलेल्या चिठ्या आढळल्या आहेत.

'या दिवशी तुझा मृत्यू', खेडमधील मॉलमध्ये अजब प्रकार, थेट जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चिठ्ठ्या
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 8:28 PM

रत्नागिरीच्या खेडमध्ये एका प्रसिद्ध शॉपिंग मॉलमधील दुकानदारांमध्ये भीती निर्माण व्हावी असा प्रकार समोर आला आहे. कारण रात्रीच्या वेळी कुणीतरी दुकानांच्या समोर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चिठ्ठ्या ठेवल्या आहेत. या चिठ्ठीत लाल रंगाच्या शाईने मजकूर लिहिण्यात आला आहे. या मजकूरमध्ये तारीख देवून या दिवशी तुमचा मृत्यू होईल, असं सांगण्यात आलं आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धमकी देणारा आपलं स्वत:चं नाव ब्लडी मॅरी असं असल्याचं म्हणाला आहे. त्याच्या या धमकीने दुकानदारांची झोप उडाली आहे. संबंधित प्रकार नेमका कुणी केला? त्याचा खरंच काही घातपात घडवण्याचा डाव आहे की थिल्लरपणा आहे? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात? याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. मॉलमधील 20 ते 25 दुकानांसमोर इंग्लिश भाषेमध्ये जीवे ठार मारण्याचा मजकूर लिहलेल्या चिठ्या आढळल्या आहेत. प्रत्येक दुकानासमोर वेगवेगळ्या तारखा नमूद केल्या असून त्या दिवशी ठार मारू, असे त्या चिठ्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे. संबंधित प्रकार हा आज सकाळी दुकाने उघडण्याच्या वेळी व्यापाऱ्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली आहे. खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अशाप्रकारे चिठ्या लिहून भयावह वातावरण निर्माण करणाऱ्यांचा तपास सुरू केला आहे.

संबंधित चिठ्ठ्या टाकणाऱ्या अज्ञात आरोपींना शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत मिळू शकते. पण त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर पोलिसांना त्याची मदत होऊ शकते. आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत का? ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, त्यांच्या कृत्यामुळे मॉलमधील दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्या आरोपींनी चांगलीच अद्दल घडायला हवी, अशी प्रतिक्रिया सर्वासामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.