आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार, निर्लज्ज आरोपी अटकेवेळीही पॉर्न पाहत बसलेला

पीडित मुलगी मंदिरातून पायी जात असताना समीर नावाचा आरोपी तिथे पोहोचला. आरोपीने मुलीला फूस लावली, त्यानंतर तो मुलीला जवळच्या जंगलात घेऊन गेला, तिथे त्याने बालिकेवर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार, निर्लज्ज आरोपी अटकेवेळीही पॉर्न पाहत बसलेला
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 8:47 AM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (New Delhi) आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला पकडले, त्यावेळी तो मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. दिल्लीतील अलीपूर भागात ही घटना घडल्याची माहिती आहे. आरोपीने मुलीला फूस लावली, त्यानंतर तो तिला जवळच्या जंगलात घेऊन गेला, तिथे तिच्यावर बलात्कार करुन आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत रात्री 8 वाजताच्या सुमारास बालिका घरी पोहोचली आणि तिने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आणि अखेर तो जाळ्यात सापडला.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबातील मुलगी 3 वर्षांपूर्वी कुटुंबासह बिहारमधून दिल्लीत आली होती. मुलीचे कुटुंब मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजता पीडिता तिच्या बहिणीसोबत जवळच्या मंदिरात गेली होती. पीडित मुलगी मंदिरातून पायी जात असताना समीर नावाचा आरोपी तिथे पोहोचला. आरोपीने मुलीला फूस लावली, त्यानंतर तो मुलीला जवळच्या जंगलात घेऊन गेला, तिथे त्याने बालिकेवर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर मुलगी जखमी अवस्थेत रात्री 8 वाजताच्या सुमारास घरी पोहोचली आणि घडलेला प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीय बुधपूरच्या जंगलात मुलीवर बलात्कार झालेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर कुटुंबीयांनी अलीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

पॉर्न फिल्म पाहताना अटक

आरोपी सुरुवातीला फरार झाला होता. पोलिस पथकाने त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. बराच तपास केल्यानंतर समीर नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. समीर हॉटेलमध्ये काम करतो. पोलिसांनी आरोपी समीरला अटक केली, त्यावेळी तो मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म पाहत होता.

संबंधित बातम्या :

भयंकर! अकरा वर्षांच्या मुलाचा 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, नांदेडमधील घटनेने खळबळ

माजी नौदल अधिकाऱ्याचा पाच जणींवर बलात्कार, दुष्कृत्यानंतर मेसेज करायचा, ‘पुन्हा कधी येऊ?’

भाच्याचा मामीवर बलात्कार, शूटिंग करुन पुन्हा रुमवर येण्यासाठी ब्लॅकमेल, व्हिडीओ पाहून मामाने…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.