Video | रस्त्याच्या कडेला टोळकं दबा धरुन बसलं, गाडीतून उतरताच लाठ्याकाठ्यांनी महिलेला बदडलं, पोलिसात तक्रार

राजधानी दिल्लीतील (Delhi Crime) शालीमार बाग (Shalimar Bagh) परिसरात एका महिलेला मारहाण (Beat Woman) झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 बदमाशांनी महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्याचवेळी तेथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये मारहाणीचा हा थरार कैद झाला.

Video | रस्त्याच्या कडेला टोळकं दबा धरुन बसलं, गाडीतून उतरताच लाठ्याकाठ्यांनी महिलेला बदडलं, पोलिसात तक्रार
Shalimar-Bagh Attack on woman
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 1:14 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi Crime) शालीमार बाग (Shalimar Bagh) परिसरात एका महिलेला मारहाण (Beat Woman) झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 बदमाशांनी महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केलीये. तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये मारहाणीचा हा थरार कैद झालाय.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबरला दिल्लीतील शालीमार बाग परिसरातील एका महिलेला काही लोकांच्या टोळक्याने काठीने मारहाण केली. त्यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाहा मारहाणीचा व्हिडीओ – 

स्थानिक आमदारावर मारहाणीचा आरोप

पीडित महिलेने स्थानिक आमदारावर मारहाणीचा आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून 2 जणांना अटकही केली आहे.

महिलेला इतका जबर मार लागला होता की ती रुग्णालयातून व्हील चेअरवर बाहेर पडली. रुग्णालयातून बाहेर येताच महिलेने पहिल्यांदा हे सीसीटीव्ही फुटेज शोधून काढले, जेणेकरुन तिच्याकडे काही पुरावा असेल. पीडित महिलेने आम आदमी पार्टीच्या (आप) शालीमार बाग येथील आमदार वंदना कुमारी यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

तक्रारीच्या आधारे दोघांना अटक

याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आमदाराचाही उल्लेख आहे. मात्र अद्यापपर्यंत त्या आमदारावर अटक किंवा चौकशी न झाल्याने महिला संतप्त आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे, तर काही आरोपींचा शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत भांडी विकणाऱ्या महिलेची दहशत, फिल्मी स्टाईलने गुंगीचे औषध लावून तीन महिन्याच्या बाळाची चोरी

केडीएमसीच्या माजी स्थायी समिती सभापतीला तीन दिवसाची पोलीस कोठडी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.