Road Rage CCTV | स्कूटीस्वार चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबीय म्हणतात अपघात नाही, बाईकवाल्याच्या मारहाणीत जीव गेला

माझा मोठा मुलगा आणि वडील रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते, पोलिसांना या घटनेची माहिती मिळेपर्यंत कोणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. पोलिसांनी दोघांना रुग्णालयात नेईपर्यंत मोठ्या मुलाचा मृत्यू झाला होता, असं मोहित कुमार म्हणाले.

Road Rage CCTV | स्कूटीस्वार चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबीय म्हणतात अपघात नाही, बाईकवाल्याच्या मारहाणीत जीव गेला
दिल्लीत चिमुकल्याच्या मृत्यूनंतर गंभीर आरोपImage Credit source: इंडिया टीव्ही
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 2:34 PM

नवी दिल्ली : रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा वर्षांच्या बालकाची हत्या (Murder) झाल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. दिल्लीत (Delhi Crime) बुधवारी संध्याकाळी आजोबा-नातवाचा अपघात झाल्याचं समोर आलं होतं. मात्र दोघंही रस्त्यावरील हिंसाचाराला (Road Rage) बळी पडल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा अपघातच होता, रोड रेज नाही, असं तपासात निष्पन्न झाल्याचं द्वारका विभागाचे अतिरिक्त डीसीपी विक्रम सिंग यांनी सांगितलं आहे. दहावीतील विद्यार्थ्याला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. संबंधित विद्यार्थी आणि त्याचा मित्र बाईकने घरी जात असताना त्याने प्रेम प्रकाश यांच्या स्कूटीला धडक दिली. त्यानंतर ते बाईकसह घटनास्थळावरुन पसार झाले, असा दावा पोलिसांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

पंजाबमधील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कर्मचारी असलेले मोहित कुमार यांनी सांगितलं की घटनेच्या दिवशी त्यांचे वडील प्रेम प्रकाश स्कूटीवरुन चालले होते. त्यांचा धाकटा मुलगा स्कूटरवर पुढे उभा होता, तर मोठा मुलगा आजोबा प्रेम प्रकाश यांच्या मागे बसला होता. रस्त्यावरुन जाताना प्रेम प्रकाश यांची एका बाईकसोबत धडक झाली. यानंतर चौघा जणांनी मागच्या बाजूने येत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला, यामध्ये माझे वडील आणि मोठ्या मुलाच्या डोक्याला दुखापत झाली, असा दावा मोहित कुमार यांनी केला आहे.

माझा मोठा मुलगा आणि वडील रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते, पोलिसांना या घटनेची माहिती मिळेपर्यंत कोणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. पोलिसांनी दोघांना रुग्णालयात नेईपर्यंत मोठ्या मुलाचा मृत्यू झाला होता, असं मोहित कुमार म्हणाले.

पोलिसांनी दावा फेटाळला

दरम्यान, हा अपघातच होता, बालकाची हत्या झालेली नाही, असं पोलिसांच्या तपासात समोर आल्याचा दावा द्वारका विभागाचे अतिरिक्त डीसीपी विक्रम सिंग यांनी केला आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. तो आपल्या मित्रासोबत बाईकने घरी जात होता. त्यावेळी त्याने प्रेम प्रकाश यांच्या स्कूटीला धडक दिली. त्यानंतर तो बाईकसह घटनास्थळावरुन पळून गेला, असा दावा पोलिसांनी केला आहे. चिमुरड्याच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात आले असून तो कुटुंबीयांना सोपवण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

रॉड किंवा तत्सम वस्तूने प्रहार

“जर आमच्या वडिलांचा अपघात झाला असता, तर स्कूटीचेही नुकसान झाले असते आणि माझ्या मुलालाही दुखापत झाली असती. पण वडील आणि पुतण्या यांना डोक्यावर इजा असल्याने त्यांना रॉड किंवा तत्सम वस्तूने प्रहार झाला असावा” असा आरोप मोहित कुमार यांचा धाकटा भाऊ सचिन कुमारने केला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

गाडीचा धक्का लागल्यावरुन वाद, उल्हासनगरात अल्पवयीन मुलाला तिघांनी भोसकलं

कारला धडक देत रिक्षातील चौघांचा राडा, मुंबईत बिझनेसमनला गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न

Road Rage Video | कारला कट बसल्याचा राग, वसईत बॅटने स्कॉर्पिओची काच फोडत चालकाला मारहाण

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...