बारमध्ये काम करणाऱ्या युवतीची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरुन उडी, बार मालकावर गंभीर आरोप
युवतीला रात्री कार्यक्रमांच्या नंतर जबरदस्ती थांबवलं जात असे आणि चुकीची कामं करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता, म्हणून तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील रोहिणी भागात असलेल्या नॉर्थ एक्स मॉलच्या चौथ्या मजल्यावरुन पडून बारमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाला. बिल्डिंगमधून खाली पडल्यानंतर तरुणीला आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मयत तरुणी मूळ नेपाळी असून दिल्लीतील विजय विहार भागात बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहत होती.
काय आहे प्रकरण?
गेल्या शनिवारी रात्री ही घटना घडली. आरोपींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र युवतीच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. पोलिसांच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. बार मालक तरुणीला बार डान्सर म्हणून काम करण्यास दबाव टाकत होता, असं मयत तरुणीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. याच वादातून तिने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
कुटुंबीयांचे आरोप
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पाहिले जात आहे. पोलिसांनी रेस्टो-बारचे मालक आणि अन्य स्टाफच्या विरोधात केस दाखल केली आहे. युवतीला रात्री कार्यक्रमांच्या नंतर जबरदस्ती थांबवलं जात असे आणि चुकीची कामं करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता, म्हणून तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
मयत तरुणीचं नाव राखी असून ती 21 वर्षांची होती. नेपाळहून रोजगाराच्या शोधात ती दिल्लीला आली होती. पार्टी आयोजकांसोबत तिचा वाद झाला होता. कुटुंबीयांच्या आरोपांनंतर पोलिसांनी राखीच्या बहिणीची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
संबंधित बातम्या :
बायकोच्या डोक्याचे तीन तुकडे, टॅटू मिटवण्यासाठी हात सोलला, माथेरान हत्याकांडाचा थरारक घटनाक्रम
Nagpur| गायक युवतीनं केली सामूहिक बलात्काराची तक्रार, तपासानंतर पोलीसही चक्रावले
Pune Suicide | अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न, पुण्यातील हॉटेलमध्ये नवविवाहितेचा गळफास