सूडभावनेने महिलेवर गँगरेप, घराला कुलूप लावून तिघे पसार, दार उघडणाऱ्या पोलिसांना दिसलं भयावह दृश्य

घरी पोहोचताच तिघा जणांनी तिला मागून ढकलून आत नेले. त्यानंतर तोंड दाबून तिचे हातपाय बांधले. त्यानंतर तिघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.

सूडभावनेने महिलेवर गँगरेप, घराला कुलूप लावून तिघे पसार, दार उघडणाऱ्या पोलिसांना दिसलं भयावह दृश्य
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 2:42 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील बुरारी (Burari) परिसरात गँगरेपची (Gang Rape) खळबळजनक घटना समोर आली आहे. घरात ओलीस ठेवून तिघा जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपी घराला बाहेरुन कुलूप ठोकून निघून गेले.

काय आहे प्रकरण?

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने 29 ऑक्टोबर रोजी बुरारी पोलिस स्टेशनमध्ये एका व्यक्तीविरोधात ब्लॅकमेलिंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याचा बदला घेण्यासाठी आणि खटला मागे घ्यायला दबाव टाकण्यासाठी दानिश नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन आपल्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गुरुवारी ती बाजारातून भाजी घेऊन परत येत होती. घरी पोहोचताच तिघा जणांनी तिला मागून ढकलून आत नेले. त्यानंतर तोंड दाबून तिचे हातपाय बांधले. त्यानंतर तिघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान आरोपीने ज्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता, त्याच्याशीही ते बोलल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिला विवस्त्र अवस्थेत

घटनेनंतर आरोपींनी बाहेरून दरवाजा बंद करून पळ काढला. महिलेने कसेबसे हात सोडवून मोबाईलवरुन पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना दरवाजा बाहेरुन बंद असल्याचे दिसले. कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता महिला विवस्त्र अवस्थेत होती. तिचे हात-पाय बांधलेले दिसत होते. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात नेले आणि तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सामूहिक बलात्काराच्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला.

संबंधित बातम्या :

‘संसार रिक्षेची चाके थांबली, आत्महत्येशिवाय पर्याय नाही’, एकाच कुटुंबातील चौघांचे विषप्राशन

गुप्तधनाचे अमिष,10 लाख उकळले, पैसे परत मागितले तर म्हणे कोंबडा बनवतो, भोंदूला अटक!

पळून लग्न करायला जाताना बाईक अपघात, प्रेयसीचा जागीच मृत्यू, प्रियकर गंभीर

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.