विवाहबाह्य संबंधातून अल्पवयीन मुलाकडून विवाहितेची हत्या, मृतदेहाचे प्रायव्हेट पार्टही पेटवले

15 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील डाबरी भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता, या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार आली नव्हती. मात्र पोलिसांनी हत्येचा गुन्हा लक्षात घेऊन तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले

विवाहबाह्य संबंधातून अल्पवयीन मुलाकडून विवाहितेची हत्या, मृतदेहाचे प्रायव्हेट पार्टही पेटवले
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 9:50 AM

Delhi Dabri Murder Case : राजधानी दिल्लीत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे यावर तो थांबला नाही, तर खून केल्यानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टला त्याने आग लावली. पोलीस तपासात ही बाब समोर आली आहे. डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याने महिलेचा खून केला, त्यानंतर तिचा मृतदेह मारुती व्हॅनमध्ये टाकून डाबरी परिसरात टाकण्यात आला.

काय आहे प्रकरण?

15 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील डाबरी भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता, या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार आली नव्हती. मात्र पोलिसांनी हत्येचा गुन्हा लक्षात घेऊन तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यादरम्यान पोलिसांना महिलेची ओळख पटली.

अल्पवयीन मुलगा सीसीटीव्ही कॅमेरात कैद

त्याचवेळी पोलीस तपास करत असताना व्हॅनमधून मृतदेहाची विल्हेवाट लावताना एक अल्पवयीन मुलगा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. त्याचवेळी, तांत्रिक तपासाद्वारे हेही सांगण्यात आले की, ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी अल्पवयीन मुलाचे लोकेशन आढळले. चौकशीत अल्पवयीन आरोपीने सांगितले की, मृत महिला विवाहित असून त्याचे तिच्याशी अनैतिक संबंध होते.

व्हॅनमधून मृतदेहाची विल्हेवाट

गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील भांडण वाढले होते, त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलाने महिलेला आपल्या घरी बोलावले, तेथे पुन्हा एकदा दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तिचा खून केला. तेथे असताना त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टला आग लावली. यानंतर कारने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. पोलिसांनी हत्येत वापरलेले लोखंडी रॉड आणि मारुती व्हॅन जप्त केली आहे.

संबंधित बातम्या :

महिला लिपिकाची राहत्या घरी आत्महत्या, पती म्हणतो, ‘त्याच्या’ त्रासामुळे बायकोने आयुष्य संपवलं

लग्नमंडपात नवरदेवाची 19 वर्षीय भाची मृतावस्थेत, मावस भावाकडून बलात्काराच्या प्रयत्नानंतर खून

सासऱ्याचा तलवार हल्ला, सुनेचे दोन्ही हात कापले, डॉक्टरांनी 9 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा जोडले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.