आधी मोठ्या मुलाकरवी बलात्कार, मग लग्न लावून धाकटा मुलगा-जावयाचे अत्याचार

तिघांकडून झालेल्या अत्याचाराचा पाढा मुलीने आपल्या कुटुंबीयांसमोर वाचला. त्यानंतर महिलेने मोठ्या मुलासोबत तिचे लग्न लावण्याची तयारी दर्शवली. मात्र लग्नानंतर महिलेने तिच्यावर पुन्हा जावई आणि धाकट्या मुलाकरवी सामूहिक बलात्कार घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे.

आधी मोठ्या मुलाकरवी बलात्कार, मग लग्न लावून धाकटा मुलगा-जावयाचे अत्याचार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 3:38 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील एका कपटी महिलेने एका तरुणीशी मैत्री करुन आपल्या मोठ्या मुलाकडून तिच्यावर बलात्कार घडवून आणला. त्यामुळे पीडित तरुणीने संबंधित कुटुंबापासून स्वत:ला दूर केले. मात्र काही काळाने महिलेने पीडितेची माफी मागण्याचे नाटक केले. त्यामुळे पीडितेचे पुन्हा महिलेच्या घरी येणे-जाणे होऊ लागले, अखेर मोठ्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. त्यानंतरही महिलेच्या धाकट्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी भावांच्या मेव्हण्याने, म्हणजेच महिलेच्या जावयानेही तिच्यावर अत्याचार केले. दिल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप आहे.

तिघांकडून झालेल्या अत्याचाराचा पाढा मुलीने आपल्या कुटुंबीयांसमोर वाचला. त्यानंतर महिलेने मोठ्या मुलासोबत तिचे लग्न लावण्याची तयारी दर्शवली. मात्र लग्नानंतर महिलेने तिच्यावर पुन्हा जावई आणि धाकट्या मुलाकरवी सामूहिक बलात्कार घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेने आपल्या पतीकडे याविषयी तक्रार केली असता त्याने तिला मारहाण करून सोडले. पीडितेने दक्षिण पूर्व दिल्लीतील बदरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सामूहिक बलात्कार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने तिच्या जबाबात म्हटले आहे की, बदरपूर येथे राहणाऱ्या कविता नावाच्या महिलेशी तिची 2018 मध्ये भेट झाली. दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या. कविता यांना राजू आणि रवी ही दोन मुले आहेत. तिने अनेकदा पीडितेला आपली सून बनवण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

मोठ्या मुलाकरवी बलात्कार

जुलै 2018 मध्ये कविताने पीडित तरुणीला तिच्या घरी बोलावले. तिथे राजूने तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे. ती खूप घाबरली होती आणि तिने कोणालाही काही सांगितले नाही. तिने कविताच्या घरी जाणे बंद केले. काही काळाने कविता तिला बाजारात भेटली, आणि तिने पीडितेची माफी मागायला सुरुवात केली. पीडितेला असे वाटले की तिला आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल तिला पश्चात्ताप झाला असावा, म्हणून तिने कविताला माफ केले.

मोठ्या मुलासोबत लग्न लावले

पीडित तरुणी पुन्हा कविताच्या घरी जाऊ लागली. 18 ऑक्टोबर 2018 रोजी ती कविताच्या घरी गेली, तिथे जेवण झाल्यानंतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यानंतर कविताचा धाकटा मुलगा रवी याने आपल्यावर बलात्कार केल्याचं तिच्या लक्षात आलं. 2018 ते 2020 या काळात राजू, रवी आणि त्यांच्या मेव्हणा जितेंद्र या तिघांनी अनेक वेळा आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यानंतर तिने सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. कविताने आपल्या आई-वडिलांना मोठा मुलगा राजूसोबत लग्न लावण्यासाठी राजी केल्याचा दावा पीडितेने केला आहे. पीडितेचा विवाह 26 जुलै 2020 रोजी फरीदाबादमधील आर्य समाज मंदिर येथे राजूसोबत झाला.

लग्नानंतरही दीर-भावोजीकडून बलात्कार

यानंतर ती राजूसोबत फरीदाबादमधील पल्ला येथे भाड्याच्या घरात राहू लागली. कविताने राजू आणि पीडितेला ऑगस्ट 2020 मध्ये त्यांच्या बदरपूरच्या घरी जेवायला बोलावले होते. काही वेळाने राजू घराबाहेर गेला. यावेळी त्याचा धाकटा भाऊ रवी आणि मेहुणा जितेंद्र यांनी पीडितेवर पुन्हा सामूहिक बलात्कार केला.

याबाबत तिने राजूला सांगितल्यावर त्याने तिला मारहाण केली. लग्न झालंय, आता मी तुला हवं तसं वापरणार असं सांगू लागला. यानंतर, 1 सप्टेंबर 2020 रोजी तो पीडितेला फरीदाबाद येथे भाड्याच्या घरात सोडून गेला आणि परत आलाच नाही. पीडितेच्या जबानीच्या आधारे बदरपूर पोलीस ठाण्यात 13 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

24 वर्षीय पुतण्या नवविवाहित काकीच्या प्रेमात, दोघं घरातून रफूचक्कर, काका म्हणतो मी तिला एकदाच…

बायकोचा दुसऱ्या नवऱ्यासोबत घरोबा, पहिला पती पोलिसात, म्हणतो ‘तिला नांदायला आणा म्हणजे आणाच…’

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, धारदार चाकूने 30 वेळा वार करुन हत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.