Delhi Gang Rape | तिच्यावर बलात्कार केला जात होता आणि त्या 9 जणी पाहत होत्या? दिल्ली सामूहिक बलात्काराचे धक्कादायक सत्य
कस्तुरबा नगर महिला सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आपल्या तपासाला वेग दिला आहे. देशभरात या प्रकरणामुळे खळबळ उडाल्यामुळे दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक केलं आहे. यामध्ये एकूण सात महिला आहेत. महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची रस्त्यावर धिंड काढण्यात आली होती.
नवी दिल्ली : कस्तुरबा नगर महिला सामूहिक बलात्कार प्रकरणात (Delhi Gang Rape)पोलिसांनी आपल्या तपासाला वेग दिला आहे. देशभरात या प्रकरणामुळे खळबळ उडाल्यामुळे दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक केलं आहे. यामध्ये एकूण सात महिला आहेत. महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची रस्त्यावर धिंड काढण्यात आली होती. यावेळी अनेक महिला अपस्थित होत्या यातील 15 महिलांची ओळख पटल्याचं पोलिसांनी (Police) सांगितले आहे. सध्या पीडित महिलेचे समूपदेशन सुरु आहे. दिल्लीमधील महिलेची धिंड काढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात 27 जानेवारी रोजी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर येताच संताप व्यक्त केला गेला. दिल्ली महिला आयोगाच्या (Women Commission) अध्यक्षांनी पीडितेची भेट घेत पोलिसांना नोटीस जारी केली होती.
सुडाच्या भावनेतून महिलेवर सामूहिक बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक केलं आहे. अटक केलेल्यांमध्ये एकूण 7 महिला आहेत. तर पोलिसांनी महिलेची धिंड काढणाऱ्या आणखी 15 महिलांची ओळख पटली आहे. पोलीस त्यांच्यावरही कारवाई करणार आहेत. बलात्कार पीडित महिलेचे सध्या समूपदेशन केले जात आहे. ती आपल्या पतीसोबत दिल्लीमध्ये राहायची. या महिलेच्या आईचे घर कस्तूरबा नगरमध्ये आहे. महिलेच्या आईच्या घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीनेच पीडितेचे अपहरण केले होते. अपहरण केलेला आरोपी आणि पीडित महिला दोघेही यापूर्वी मित्र असल्याचे सांगण्यात येतेय. दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपीच्या घरातील एका तरुणाने एका वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला पीडित महिलाच जबाबदार आहे, असे मत आरोपीच्या घरच्यांचे होते. त्यामुळे सुडाच्या भावनेतून पीडित महिलेचे अपहरण करण्यात आले. महिलेला अद्दल घडवण्यासाठी आरोपीने अपहरण केले,” असे पोलिसांनी सांगितले. याबाबतचे सविस्तर वृत्त आजतकने दिले आहे.
बलात्कार करण्यासाठी महिला देत होत्या प्रोत्साहन
दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी पीडित महिलेची भेट घेतली आहे. त्यानंतर “महिलेचे तिच्या घरातून अपहरण करण्यात आले. दारू तसेच अवैध व्यापर करणाऱ्या लोकांनी तिचा सामूहिक बलात्कार केला. माझ्यावर सामूहिक बलात्कार केला जात होता. तर बाजूच्या महिला तसं करणाऱ्या बलात्काऱ्यांना प्रोत्साहित करत होत्या, असे पीडित महिलेने सांगितले आहे,” अशी माहिती स्वाती मालिवाल यांनी दिली.
इतर बातम्या :
Crime | सिगारेट उधार न दिल्याचा राग, दारुच्या नशेत दुकानदाराचा खून, रात्रीच्या अंधारात भयंकर कृत्य
अनैतिक संबंध ठेवलेल्या आईचं रुप मुलानं बिघतलं, प्रियकराकडून आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं!