Delhi Murder : दिल्लीतल्या गांधी नगरमध्ये का चिरला महिलेचा गळा? आता नातेवाईकांची न्यायासाठी याचना

गांधीनगर परिसरात हत्या करण्यात आलेल्या महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. माहितीनुसार, महिलेच्या समोरील इमारतीमध्ये राहणाऱ्या दोन व्यक्तींनी महिलेच्या घराचा दरवाजा वाजवला असता एक महिला दुसऱ्या मजल्यावर बेशुद्ध पडल्याचे त्यांना आढळून आले.

Delhi Murder : दिल्लीतल्या गांधी नगरमध्ये का चिरला महिलेचा गळा? आता नातेवाईकांची न्यायासाठी याचना
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 4:22 PM

राजधानी दिल्लीतील (Delhi) गांधीनगर परिसरात एका महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर महिलेचा मृतदेह सापडला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा (Women) मृतदेह विवस्त्र अवस्थेत होता, त्यामुळे बलात्काराची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत तपास केला. हे प्रकरण दिल्लीतील गांधीनगर (Gandhinagar) भागातील आहे. शुक्रवारी एका घरात एका 23 वर्षीय महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती.

गांधीनगर परिसरात महिलेची गळा चिरून हत्या

गांधीनगर परिसरात हत्या करण्यात आलेल्या महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. माहितीनुसार, महिलेच्या समोरील इमारतीमध्ये राहणाऱ्या दोन व्यक्तींनी महिलेच्या घराचा दरवाजा वाजवला असता एक महिला दुसऱ्या मजल्यावर बेशुद्ध पडल्याचे त्यांना आढळून आले. तर तिथे दुसरी महिला रोहिणी (नाव बदलले आहे) रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होती. महिलेच्या मानेमधून रक्त वाहत होते. या दोन व्यक्तींने बाहेर येत आरडाओरड करत पोलिसांना याबद्दल माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

अपघात कि हत्या? पोलिसांनी केला वेगळाच दावा

मयत महिला इमारतीमध्ये तळमजल्यावर दोन मुले आणि पतीसह राहत होती. महिलेचा पती एका कपड्याच्या कारखान्यात काम करतो. घटनेच्या वेळी महिलेचा पती कारखान्यात होता. माहिती मिळताच पतीसह नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने लोकांना धक्काच बसला आहे. मात्र, याप्रकरणात पोलीसांनी हत्या झाली नसून हा अपघात असल्याचे म्हटले आहे. तर मृताच्या नातेवाईकांनी मर्डर झाल्याचे म्हणत न्यायाची मागणी केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.