कासिमने हिंदू मुलीवर झाडली गोळी, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स तैनात

कासिम मुलीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत होता का?. तणाव वाढण्याची शक्यता असल्याने पोलील Action मोडमध्ये. परिसरात तणावाच वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कासिमने हिंदू मुलीवर झाडली गोळी, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स तैनात
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 9:55 AM

Delhi Nand Nagri crime Case : दिल्लीच्या नंद नगरीमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. मुस्लिम समाजातील एका युवकाने हिंदू मुलीवर गोळी झाडली. जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गोळी चालवणारा आरोपी कासिमला अटक केली आहे. आरोपीची चौकशी सुरु आहे, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या घटनेमुळे परिसरात तणावाच वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुलगी घरात एकटी होती

सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास आरोपी कासिमने अल्पवयीन मुलीवर गोळी झाडल्याची आम्हाला माहिती मिळाली, असं दिल्ली नॉर्थ-ईस्ट ड्रिस्ट्रिक्टचे डीसीपी जॉय टिर्की यांनी सांगितलं. आरोपी गोळी झाडल्यानंतर घटनास्थळावरुन पसार झाला. अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी शेजारी राहणारा कासिम तिथे आला व त्याने गोळी झाडली. ही गोळी मुलीच्या खांद्याला लागली. शेजारी मुलीला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. या मुलीच्या प्रकृतीला आता कुठलाही धोका नाहीय. कासिम एका मोबाइलच्या दुकानात नोकरी करतो. मुलीच्या शेजारीच कासिम आपल्या कुटुंबासोबत राहत होता.

मुलगी रुग्णालयात दाखल

शेजाऱ्यांनी सांगितलं की, दोघांमध्ये अफेयर होतं. दोघे परस्परांना ओळखत होते. मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर फोनवर बोलत होती. त्या रागातून कासिमने मुलीवर गोळी झाडली. कासिम अनेक दिवसांपासून या मुलीला धमकी देत होता. मुलीला रुग्णालयात नेलं, त्यावेळी जबानीत तिने कासिमच नाव घेतलं. धर्म परिवर्तनासाठी दबाव का?

आरोपी कासिमला अटक केल्यानंतर त्याच्याकडे बंदूक कुठून आली, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. कासिम मुलीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत होता का? या अँगलने सुद्धा पोलीस तपास करणार आहेत. मुलगी सध्या रुग्णालयात असून पोलीस टीमने माहित जमवली आहे. तिच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्यानंतर तिच्याकडून विस्तृत माहिती घेतली जाईल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.