क्रिकेट विश्वातील तो भयानक काळ, दिल्ली पोलीस डॉन शोधायला गेले, सापडले मॅच फिक्सिंग करणारे मोठमोठे सट्टेबाज

क्रिकेट विश्वातील एका भयानक काळाविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत (Delhi Police retire inspector Ishwar Singh was arrested worlds largest bookie)

क्रिकेट विश्वातील तो भयानक काळ, दिल्ली पोलीस डॉन शोधायला गेले, सापडले मॅच फिक्सिंग करणारे मोठमोठे सट्टेबाज
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 3:28 PM

मुंबई : भारतात क्रिकेट खेळावर लोकांचं प्रचंड प्रेम आहे. या खेळाशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आजही लाखो लोक आपल्या हातातील काम सोडून टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहत बसतात. मात्र, क्रिकेट विश्वातील एका भयानक काळाविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तो काळ म्हणजे 1999 ते 2002 दरम्यानचा कालावधी. क्रिकेट विश्वावर फार मोठं संकट ओढावलं होतं. मोठमोठ्या दिग्गजांची सट्टेबाजीत नावे समोर आली होती. या घटनेमुळे लाखो क्रिकेट चाहत्यांची मने दुखावली होती. दिल्ली पोलिसांनी क्रिकेट विश्वातीस सट्टेबाजांचा छळा कसा लावला त्याबाबतच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (Delhi Police retire inspector Ishwar Singh was arrested worlds largest bookie).

दिल्ली पोलीस डॉनला शोधायला गेले सट्टेबाजांपर्यंत पोहोचले

दिल्ली पोलिसातील तत्कालीन एसपी इश्वर सिंह यांनी याप्रकरणाचा छळा लावला होता. खरंतर ते दुसऱ्या एका डॉनचा तपास लावत होते. मात्र, तपास करताना त्यांना क्रिकेट विश्वातील सट्टेबाज सापडले. इश्वर सिंह आता निवृत्त झाले आहेत. पण त्यांनी केलेलं काम हे इतिहासात लिहिलं गेलं आहे. खरंतर ते मध्य दिल्ली जिल्ह्यातील एका हाय प्रोफाईल अपहरण प्रकरणाचा छडा लावत होते. मात्र, त्यांना तपास करताना सट्टेबाज सापडले.

दिल्ली पोलिसांच्या हाती तीन मोबाईल नंबर लागले

दुबईहून एक डॉन दिल्लीतील एका मोठ्या कपड्यांच्या व्यापाऱ्याला धमकीचे फोन करत होता. त्याच प्रकरणाचा तपास इश्वार सिंह करत होते. या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांच्या हाती तीन फोन नंबर लागले. आधी त्यांच्या हाती +971-50-6799XXX आणि +971-50-6797XXX हे दोन नंबर लागले. या दोन नंबरचे कॉल ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, भारतातून 98100XX411 हा नंबर त्यांच्या संपर्कात आहे (Delhi Police retire inspector Ishwar Singh was arrested worlds largest bookie).

एक नंबर भारतातला

98100XX411 या नंबरचा तपास केला असता हा नंबर त्याकाळी भारतातील सर्वात प्रसिद्ध कॅसेट किंग म्हणून ख्याती असलेल्या उद्योगपतीच्या लहान भावाच्या नावाने रजिस्टर होता. इश्वर सिंह यांनी तीनही नंबरच्या फोनवरील बातचित ऐकली तर त्यांना सुरुवातीला धक्काच बसला. त्यांना सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. कारण ते क्रिकेट विश्वातील सट्टेबाजीबाबत चर्चा करत होते.

पोलिसाचं आधी दुर्लक्ष नंतर दखल

इश्वर सिंह यांना त्यावेळी क्रिकेट खेळाविषयी जास्त आवड नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी याप्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. मात्र, तरीदेखील ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या तीन नंबरवर होणारी बातचित ऐकत असायचे. एकदा त्यांनी असाच एक कॉल ऐकला तर त्यांना मोठा धक्का बसला. कारण त्या नंबरवर दोन मोठे सट्टेबाज मॅचफिक्सिंगबाबत चर्चा करत होते. विशेष म्हणजे एकदा त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिये, संजीव चावला आणि आणि भारतात बसलेल्या इतर सट्टेबहबाजांमधील फोनवरील चर्चा ऐकली. यावेळी इश्वर सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याचं ठरवलं. हॅन्सी क्रोनियो आणि संजीव चावला यांच्यात झालेल्या संभाषणात सिंह यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ते दिल्लीच्या एका हॉटेलच्या बाल्कनीत भेटणार असल्याची चर्चा त्यांनी ऐकली.

मॅच फिक्सिंगच्या बातम्या उघड होताच खळबळ, दिल्ली पोलिसांवर निशाणा

दरम्यान, इश्वर सिंह यांच्या जबानावर दिल्ली क्राईम ब्रांचने 23 मार्च 2002 साली गुन्हा दाखल केला. मॅच फिक्सिंग संबंधित बातम्या जेव्हा समोर आल्या तेव्हा संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. लाखो चाहत्यांना झटका बसला. पोलिसांनी कृष्ण कुमार, सुनील दारा उर्फ बीट्टू आणि राजेश कालरा यांनी अटक केली. हे तिघंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे बुकी संजीव चावला याच्या ग्रुपचे सदस्य होते. दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरु करताच संजय चावला इंग्लंडला फरार झाला. यानंतर अनेकांनी दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला.

हॅन्सी क्रोनिनचा कबुलनामा

विशेष म्हणजे दक्षिण आफ्रीकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिनचं नाव समोर आल्यानंतर त्याच्या संघातील इतर खेळाडू त्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांवर टीका होऊ लागली. पण दिल्ली पोलिसांनी हार मानली नाही. त्यावेळी पोलिसांकडे सट्टेबाजांचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड केलेलं होतं. हे संभाषणच खूप मोठा पुरावा होता. या ऑडिओ रेकॉर्डनेच दिल्ली पोलिसासांठी एक कवचचं काम केलं. दिल्ली पोलिसांना यश तेव्हा आलं जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅसी क्रोनिनने स्वत: हून आपला गुन्हा कबूल केला. त्याने 11 एप्रिल 2002 साली सार्वजनिकरित्या आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर सर्व उघड झालं.

हेही वाचा : भारतीय महिला संघाच्या धडाकेबाज खेळाडूला कोरोनाची लागण, घरातच आयसोलेट

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.