अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये, घटनास्थळाची परिस्थिती बघून पोलीसही भांबावले

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय महिलेचा प्लास्टिकच्या ड्रममध्ये संशयास्पद मृतदेह आढळला आहे (Delhi woman dead body found suspiciously in her house)

अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये, घटनास्थळाची परिस्थिती बघून पोलीसही भांबावले
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:52 AM

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय महिलेचा प्लास्टिकच्या ड्रममध्ये संशयास्पद मृतदेह आढळला आहे. महिलेच्या कुटुंबियांनी तिने आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. मात्र, घटनास्थळावरची परिस्थिती बघून ही हत्या की आत्महत्या? अशा विचारात पोलीस पडले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेने संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे (Delhi woman dead body found suspiciously in her house).

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही उत्तर पूर्व दिल्ली जिल्ह्यात घडली आहे. मृतक महिला आपल्या कुटुंबासह दिल्लीतील त्रिनगर परिसरात वास्तव्यास होती. तिचं सीमा असं नाव होतं. तिचं 2010 मध्ये शैलेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. दोघांना तीन लहान मुलं आहेत. त्यांचं वैवाहिक जीवन नेमकं कसं सुरु होतं, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. संबंधित घटना 11 मे रोजी समोर आली. महिलेच्या कुटुंबियांनी 11 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलिसांना फोन करुन महिलेच्या मृत्यूची माहिती दिली (Delhi woman dead body found suspiciously in her house).

घटनास्थळाची परिस्थतिथी बघून पोलीसही विचारात

पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांना महिलेचा मृतदेह संशयास्पद आढळला. महिलेचा अर्ध शरीर हे प्लास्टिकच्या ड्रममध्ये तर अर्ध शरीर ड्रमच्या बाहेर होतं. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. मृतक महिलेच्या सासरच्यांनी तिने आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. पण अशा प्रकारची आत्महत्या बघून पोलीसही विचारात पडले. कारण महिलेला आत्महत्या करायची असेल तर ती प्लास्टिकच्या ड्रममध्ये कशी आत्महत्या करु शकते? असा प्रश्न पोलिसांना पडला.

महिलेच्या माहेरच्यांचा तिच्या सारच्यांवर गंभीर आरोप

महिलेच्या माहेरच्यांना तिच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आली. महिलेचा भाऊ प्रदीप कुमार घटनास्थळी दाखल झाला. मात्र, तोपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा झाला होता. तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. महिलेचा भाऊ प्रदीपने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले. “माझी बहीण आत्महत्या करुच शकत नाही. तिचे सासरचे तिला खूप त्रास द्यायचे. तिची प्रतारणा करायचे. तिने मला फोनवर अनेकदा तिचं दु:ख सांगितलं होतं”, असं त्याने पोलिसांना सांगितलं.

महिलेच्या भावाने पोलिसांना नेमकं काय सांगितलं?

“माझी बहीण सीमासोबत 10 मे रोजी मारहाण झाली होती. तिने घडलेला सगळा प्रकार मला फोनवर रडत-रडत सांगितला होता. माझ्या बहिणीने त्याआधी देखील अनेक वेळा सासरच्यांकडून होत असणाऱ्या त्रासाची तक्रार केली होती. तिचा पती शैलेंद्र हा दुसऱ्या एका मुलीच्या प्रेमात आहे. तो तिच्यावर पैसे खर्च करतो. तो सीमाला वारंवार तू आत्महत्या कर, असं सांगायचा. शैलेंद्रची बहीण आणि भाच्याने तिला मारहाण केली होती. त्यामुळे माझी बहीण नैराश्यात गेली होती”, असं प्रदीप कुमारने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांच्या हाती सुसाईड नोट

पोलिसांना मृतक महिलेच्या बेडखाली एक सुसाईड नोट मिळाली आहे. पण संबंधित नोट सीमाने लिहिली नसून तिच्या पतीच्या बहिणीने लिहिली असेल, असा दावा प्रदीप यांनी केला आहे. “माझ्या बहिणीची आधी हत्या करण्यात आली. त्यानंतर तिला ड्रममध्ये टाकण्यात आलं”, असं प्रदीप पोलिसांना म्हणाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून एकाला अटक

सीमाचा भाऊ प्रदीप कुमारने पोलिसांना तिच्यासोबत फोनवरील संभाषणाचा एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यामध्ये सीमा आपल्यासोबत होत असलेल्या अत्याचाराबाबत रडत माहिती देत होती, असा दावा प्रदीपने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पण महिलेच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्या सर्व मंडळींना अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे.

हेही वाचा :

20 वर्षीय तरुणीशी पळून जाऊन लग्न, रिक्षाचालकाची हत्या, 5 जणांना कोठडी

दैवी शक्तीने कोरोना बरा करतो, अंगात शेषनाग संचारतो, पैशांचा पाऊस पाडतो, नागपुरात ढोंगीबाबाचा फिल्मी स्टाईल पर्दाफाश

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.