कुदरतच्या हातावर त्याच्या नावाचा टॅटू, अखेर रुम बुक करुन तिथे असा केला ‘प्रेमाचा शेवट’

Crime news : कपिल ड्रायव्हिंगचे काम करायचा. कुदरतचे शाहीन बाग येथे टेलरिंगचे दुकान आहे. दोन वर्षांपूर्वी दोघांची करोल बाग येथील एका दुकानात भेट झाली. शाहीनबागच्या मुलीचा हिंदू मुलावर जडलेला जीव.

कुदरतच्या हातावर त्याच्या नावाचा टॅटू, अखेर रुम बुक करुन तिथे असा केला 'प्रेमाचा शेवट'
Murder case
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 11:06 AM

नवी दिल्ली : काही दिवसापूर्वी मसुरीच्या होम स्टेमध्ये एक 24 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळला होता. पोलिसांकडून मंगळवारी या हत्या प्रकरणाची उकल केल्याचा दावा करण्यात आला. पोलिसांनी दिल्ली स्थिती एका भाऊ-बहिणीला हरिद्वार येथून अटक केली आहे. कपिल चौधरीचे दिल्लीच्या शाहीन बागमध्ये राहणाऱ्या कुदरत बाशर या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मागच्या दोन वर्षांपासून त्यांचं प्रेम प्रकरण सुरु होतं. काही दिवसांपूर्वी कपिलने तुझ्याशी लग्न करता येणार नाही, असं कुदरतला सांगितलं. त्यासाठी त्याने धर्माच कारण दिलं. दोघांचे धर्म वेगळे होते. कुदरतच्या मनगटावर कपिलच्या नावाचा टॅटू होता. तिच त्याच्यावर भरपूर प्रेम होतं. कुदरतने कपिलला समजावण्याचा प्रयत्न केला. मी घरच्या सगळ्या गोष्टी संभाळून घेईन, असं तिने सांगितलं. पण कपिल तयार झाला नाही. तपास अधिकाऱ्याने ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कुदरत आणि अब्दुल्लाला अटक केली. “कपिल रुरकीचा निवासी होता. त्याचे वडील उत्तर प्रदेश पोलीस दलात कार्यरत आहेत. दोघांच्या मनात परस्पराबद्दल भावना निर्माण झाल्या. कपिल कुदरतला भेटण्यासाठी दिल्लीला जाऊ लागला” डेहराडूनचे एसएसपी दालीप सिंह कुनवर यांनी ही माहिती दिली.

कशी केली हत्या?

संतापलेल्या कुदरतने आपल्या भावाला अब्दुल्लाला याबद्दल सांगितलं. त्यांनी कपिलला मुसरीला येण्यासाठी राजी केलं. होमस्टेमध्ये त्यांनी रुम बुक केला. 10 सप्टेंबरला कपिल मसुरीमध्ये होता. तिथे गाढ झोपेत असताना, अब्दुल्लाने त्याचा गळा चिरला. कुदरतही त्यावेळी तिथे होती. तिथून पळण्याआधी बिछान्यामध्ये त्यांनी कपिलचा मृतदेह गुंडाळून ठेवला व दोघे भाऊ-बहिण कपिलची कार घेऊन पळाले. …तेव्हा ठरवलं, आता बदला घ्यायचाच

दोघांमध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. पण कपिलने तुझ्याशी लग्न करता येणार नाही, असं कुदरतला सांगितलं, त्यानंतर सगळं फिस्कटलं. तिने तिच्या भावाला याबद्दल सांगितलं. दोघांनी बदला घ्यायच ठरवलं. त्यांनी हत्येच कारस्थान रचलं. चौकशीत दोघा बहिण-भावंडांनी हत्येच्या गुन्ह्यची कबुली दिली. दोघांना स्थानिक कोर्टात हजर केल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात आलं. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू त्यांच्याकडून जप्त केलाय.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.