अख्खा बंगलाच लुटून पळाले होते, दरोडा टाकण्याची पद्धत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल, ते घराजवळ यायचे आणि…
नाशिकच्या ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून महावितरण कंपनीच्या रोहित्रांमधील तांबेच्या पट्ट्या चोरीच्याबाबत तपास सुरू होता त्यात चार संशयितांना अटक करण्यात आली होती.

नाशिक : गुन्हेगारी करत असतांना गुन्हेगार पोलीसांच्या (Crime) तावडीत सापडणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करीत असतात. गुन्हा करत असतांना कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही याचीही काळजी घेत असतात. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. तांत्रिक बाबींचा आधार घेऊन अनेकदा गुन्हेगार शोधणे कठीण होत असते. त्यामुळे गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलिसांचा (Nashik Police) कस लागत असतो. अशीच एक घटना नाशिकच्या सिन्नर (Nashik News) तालुक्यात घडली होती. त्याचा तपास करण्यासाठी बरेच दिवस लागले आहे. सिन्नरच्या ढकांबे गावात दरोडयाची घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
खरंतर दरोडयाची घटना उघडकीस येण्यामागील पोलिसांनी विविध अंगानी केलेला तपास महत्वाचा भाग ठरला आहे. त्यामुळे पोलिसांना मोठ्या गुन्ह्याची उकल करता आली आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात महावितरण कंपनीच्या रोहित्रांमधील म्हणजेच डीपीतील तांब्याच्या पट्ट्या चोरी करणारी टोळी कार्यरत होती. तीचा शोध घेत असतांना दरोडयाची घटना उघडकीस आली आहे.




नाशिकच्या ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून महावितरण कंपनीच्या रोहित्रांमधील तांबेच्या पट्ट्या चोरीच्याबाबत तपास सुरू होता त्यात चार संशयितांना अटक करण्यात आली होती.
त्यांची चौकशी करत असतांना त्यांनी दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे. सतरा लाखाहून अधिक किमतीचा मुद्दमाल चोरीला गेला होता.
चोरीला गेलल्या मुद्देमालापैकी साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीतील मुख्य सूत्रधार हा नाशिकमधील आहे. त्याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
दरोडा टाकणारी टोळीच पोलीसांनी जेरबंद केली आहे. यामध्ये नाशिकसह औरंगाबाद, धुळे, पुणे आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांनी दरोडे टाकले आहे. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
सिन्नर तालुक्यातील रतन शिवाजी बोडके यांच्या बंगल्यावर दरोडा टाकला होता, त्यात साडेसतरा लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता, याशिवाय दरोडेखोरांनी घरातील स्वयंपाक आणि दिवाळीचा फराळही फस्त केला होता.
ऐन दिवाळीच्या काळात घर बंद असल्याचे पाहून दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. डीपीच्या तांब्याच्या पट्ट्या चोरीच्या शोधात असतांना त्यांना बंद अवस्थेत बंगला दिसला होता.
त्याच दरम्यान त्यांनी बंद अवस्थेत असलेल्या बंगल्याचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून अवघ्या काही मिनिटांत त्यांनी मुद्देमाल आणि रोकड लंपास केली होती. धारधार शस्र जवळ असल्याने काही मिनिटात दरवाजा तोडून प्रवेश करतात.
दरवाजा बंद करून घेतात आणि चोरी करतात. त्यामुळे बाहेरून जाणाऱ्या व्यक्तीला कुठलाही संशय येत नाही. चोरी करतांना शक्यतो चारचाकी वाहनाचाच वापर करतात.
या कारवाईत पोलीसांनी मुख्य सूत्रधार नौशादसह शेख, इरशाद शेख, लखम कुंडलिया, रवी उर्फ लालू फुलेरी, इकबाल खान भुरा उर्फ पवन फुलेरी यांना अटक केली आहे.
संशयित आरोपींपैकी तिघांना पुण्यातील कारागृहातून ताब्यात घेतले आहे. दिवाळीत घडलेल्या घटनेचा तपास आत्ता लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून दरोडयाची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे.