Mumbai Police : उंदिरमामा बडे हुशार!! 10 तोळे सोन्याची पिशवी घेऊन खेळू लागला, मालक-भिकारी-पोलीस सर्वांचीच झोप उडाली, वाचा सोनं कसं सापडलं?

दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरे कॉलनी परिसरात राहणारी सुंदरी नावाची महिला राहते. आपल्या मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी त्या निघाल्या होत्या.

Mumbai Police : उंदिरमामा बडे हुशार!! 10 तोळे सोन्याची पिशवी घेऊन खेळू लागला, मालक-भिकारी-पोलीस सर्वांचीच झोप उडाली, वाचा सोनं कसं सापडलं?
10 तोळे सोन्याची पिशवी घेऊन खेळू लागलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 1:19 PM

मुंबई – दिंडोशी (Dindoshi) परिसरात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 10 तोळे सोने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. सुका पाव समजून भिकाऱ्याने ही सोन्याची पिशवी कचऱ्यात फेकली होती. कैद सीसीटीव्हीच्या (CCTV) मदतीने पोलिसांनी सोन्याने भरलेले दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उंदराकडून काढून घेतलेली पिशवी पोलिसांनी संबंधित महिलेला दिली आहे. त्यांची किंमत अंदाजे 5 लाख रुपये आहे. पावाच्या नादात पिशवी फेकली आणि संपुर्ण यंत्रणा कामाला लागली अशी स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे पिशवी तात्काळ सापडली आहे.

नेमकं काय झालं

दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरे कॉलनी परिसरात राहणारी सुंदरी नावाची महिला राहते. आपल्या मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी त्या निघाल्या होत्या. घरात ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्यासाठी त्यांनी घरातून सोनं घेतलं होतं. सुंदरी या घरकाम करतात. तिकडे त्यांनी कामाला जाताना सोनं नेलं होतं. ते सोनं एका पिशवीत ठेवलं होतं. कामावरून निघताना मालकाने त्यांना एक पाव दिला. तो त्यांनी सोने असलेल्या पिशवीत टाकला. सुंदरी यांनी पिशवीत ठेवलेला पाव मुलाला दिला आणि त्या बॅंकेत निघून गेल्या. बॅंकेत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की सोन्याची पिशवी भिकाऱ्याला दिली आहे. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. त्यानंतर ही माहिती पोलिसांना सांगितली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी तात्काळ तापस सुरू केला

दिंडोशी पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख सुरज राऊत यांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. अधिकारी सूरज राऊत यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. ती भिकारी महिला निघून जाताना दिसली.पोलिसांनी महिलेशी संपर्क साधला असता तिने वडापाव कोरडा असल्याचे सांगितले. तसेच तो भाव कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिशवीसह तो सोबत फेकून दिला असे सांगितले.

उंदीर ती पिशवी घेऊन जवळच्या नाल्यात शिरला

पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिशवी शोधण्यास सुरुवात केली. मात्र पिशवी तेथे सापडली नाही. पोलिसांनी कचराकुंड्याजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर पोलीस ज्या कचऱ्याची पिशवी शोधत होते. ती उंदराच्या ताब्यात असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात एक उंदीर त्या पिशवीत घुसला होता. तसेच पिशवीत ठेवलेला वडापाव खात इकडे तिकडे फिरत होता. पोलिसांनी उंदराचा पाठलाग केला. तोपर्यंत उंदीर ती पिशवी घेऊन जवळच्या नाल्यात शिरला.

त्यानंतर पोलिस नाल्यात शिरले त्यांनी शिताफीने उंदराच्या ताब्यातील पिशवी आपल्याकडे घेतली. त्यानंतर ती पिशवी सुंदरी नावाच्या महिलेला परत देण्यात आली.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.