क्षुल्लक कारणावरुन वाद, तरुणाची दगडाने ठेचून हत्या, तैमूर गावात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा
नवी दिल्लीच्या न्यू फ्रेंडस परिसरातील तैमूर नगर गावात एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवन ऋषी (वय 35) असं हत्या करण्यात आलेल्याचं नाव आहे. देवन हा त्याच्या भावाला भेटण्यासाठी गावाला जात होता. अशा प्रकारची घटना होत असताना पोलीस काय करत होते, असाही प्रश्न यावेळी समोर येतोय.
नवी दिल्ली : दिल्लीच्या (Delhi) न्यू फ्रेंडस परिसरातील तैमूर नगर गावात एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवन ऋषी (वय 35) असं हत्या करण्यात आलेल्याचं नाव आहे. देवन हा त्याच्या भावाला भेटण्यासाठी गावाला जात होता. यावेळी त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात काहीकाळ कायदा आणि सुव्यवस्थेचा (law and order) प्रश्न निर्माण झाला. काहीकाळ याठिकाणी तणावाचंही वातावरण होतं. अशा प्रकारे दगडाने ठेचून हत्या होत असेल तर पोलीस काय करत होते, असाही प्रश्न यावेळी समोर येतोय. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येप्रकरणी दोन अल्पवयिनांना पकडण्यात आलं आहे. पोलिसांना हत्येमागचं कारण आगपेटी मागण्यावरुन झालेला वाद असल्याचं सांगतिलं आहे. यावेळी पोलिसांनी (Police) हे देखील म्हटलं आहे की, लुटमार सारखा कोणताही प्रकार झाला नसून मृत देवन ऋषी याच्याजवळ त्याचं सगळं साहित्य मिळून आलं आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी मध्यरात्री म्हणजेच जवळपास दीड वाजता न्यू फ्रेंडली भागातील एम्स ट्रॉमा सेंचरमधून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांना सांगण्यात आलं की, 35 वर्षीय इसमाच्या डोक्यावर मार लागला आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. तेव्हा त्याठिकाणी कुमार चौधरी नावाचा एक मुलगा होता. त्यानं पोलिसांना सांगितलं की, त्याच्या भावाची सोमवारी कोणत्यातरी कारणावरुन दोन मुलांसोबत बाचाबाची झाली होती. यावेळी देवन ऋषीच्या डोक्यावर मार लागला. देवनचा वाद ज्यांशी झाला ते लोक अनोळखी होते. दरम्यान, बाचाबाची झाल्यानंतर झालेल्या वादात देवन ऋषीच्या डोक्यावर मार लागला. त्यानंतर देवनला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान देवनचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना अल्पवयीन मुलांना पकडलं असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा
मृतकाचा भाऊ कुमार चौधरी आणि कुटुंबातील इतर सदस्यांना सांगितलं की, देवन हा कष्ट आणि मजूरी काम करुन कुटुंबा चालवतो. देवनच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि चार मुले आहेत. देवन हा जसौला या गावात भाड्यानं राहत होता. देवन याचा मृत्यू झाल्यानं घरातील कमावता व्यक्ती गेल्यानं कुटुंबसमोर पोट कसं भरावं, असा प्रश्न आहे. त्यामुळे देवन ऋषीच्या कुटुंबियांना आता मदतीची गरज आहे. तर दुसरीकडे अशा प्रकारचे कृत्य होत असताना पोलिसांचा धाक कमी झालाय का, असाही प्रश्न सध्या तैमूर गावात चर्चेच्या केंद्र स्थानी आहे. आता यावर पोलीस प्रशासन काय पाऊल उचलतं, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
इतर बातम्या