डोंबिवलीत धक्कादायक घटना, दारुसाठी पैसे आणि बसायला खुर्ची दिली नाही म्हणून सुरक्षारक्षकाला मारहाण

डोंबिवलीत क्षुल्लक कारणातून मारहाणीच्या घटना उघडकीस येत आहेत. आज पुन्हा कोपर रोडवर मारहाणीची घटना घडली आहे.

डोंबिवलीत धक्कादायक घटना, दारुसाठी पैसे आणि बसायला खुर्ची दिली नाही म्हणून सुरक्षारक्षकाला मारहाण
डोंबिवलीत क्षुल्लक कारणातून सुरक्षारक्षकाला मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 2:22 PM

डोंबिवली : डोंबिवलीत गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. क्षुल्लक कारणातून मारहाण करणे, हत्या करणे अशा घटनांमुळे सांस्कृतिक शहराची आता गुन्हेगारी शहर अशी ओळख होत चालली आहे. अशीच एक घटना डोंबिवली कोपर रोडवर आज पुन्हा उघडकीस आली आहे. कोपर रोड परिसरातील पटेल आर मार्टच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण केल्याची घटना घडली आहे. दारुसाठी पैसे दिले नाही, बसायला खुर्ची दिली नाही म्हणून तरुणाने सेक्युरिटी गार्डला दगडाने मारहाण केली. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली पश्चिमेला शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या परीसरात हा प्रकार घडला. पटेल आर्ट मार्ट या दुकानाचा सुरक्षारक्षक पाऊस असल्याने टेम्पोमध्ये झोपला होता. मध्यरात्री 2.50 च्या सुमारास हर्षद कुशाळकर हा तरुण या ठिकाणी आला. तो गार्डकडे दारू पिण्यासाठी पैसे आणि बसायला खुर्ची मागू लागला. मात्र गार्डने त्याला नकार दिला. याचा राग आल्याने हर्षदने त्याच्या डोक्यात दगड आणि पेव्हर ब्लॉक मारला. या घटनेत मुन्नीराम सहानी हा सिक्युरिटी गार्ड जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

यासंदर्भात विष्णुनगर पोलिसात गुन्हा दाखल करत हर्षदला अटक केली आहे. हर्षद हा कोपरमधील सिद्धार्थ नगर झोपडपट्टीमध्ये राहतो. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

हे सुद्धा वाचा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.