धक्कादायक! जॉब ऑफरच्या लिंकवर डोंबिवलीत राहणाऱ्या महिलेने क्लिक केलं, पण….
Crime News : तुम्हाला सुद्धा अतिरिक्त कमाईची संधी म्हणून अशा लिंक येतील, त्यावर क्लिक करण्याआधी ही बातमी एकदा वाचा. तुम्ही नोकरी करत असताना, अतिरिक्त कमाईचा विचार मनात येते. अशावेळी काही जाहीरातींमध्ये अशी संधी दिसते.
ठाणे : अनेकदा तुम्हाला इंटरनेटवर अतिरिक्त कमाईची संधी म्हणून जाहीराती दिसतात. काहीवेळा तुम्हाला मोबाइलवर एक्स्ट्रा कमाईची संधी म्हणून लिंक येतात. काहीजण अतिरिक्त पैसा कमावण्यासाठी अशा लिंकवर क्लिक करतात. त्यातून बऱ्याचदा फसवणूक होण्याचा धोका असतो. कारण हे सगळं ऑनलाइन असतं. ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीमध्ये राहणारी एका महिला अशाच जॉब ऑफरच्या लिंकला बळी पडली. त्यामध्ये या महिलेच मोठ आर्थिक नुकसान झालं. संबंधित महिला डोंबिवली गरीबाचा वाडा येथे राहते. सदर महिला मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तिने एका पार्ट टाइम ऑनलाइन जॉब ऑफरच्या लिंकवर क्लिक केलं. नोकरी व्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्नाच साधव हवं, म्हणून सदर महिला पार्ट टाइम नोकरीच्या शोधात होती.
18 ऑगस्टला तिने अशाच एक ऑनलाइन जॉब ऑफरच्या लिंकवर क्लिक केलं. पार्ट टाइम अतिरिक्त कमाईच या महिलेला आश्वासन मिळालं होतं. ही सगळी प्रोसेस ऑनलाइन होती. घोटाळेबाजांनी या महिलेला टेलिग्राम ग्रुप जॉइन करायला सांगितला. वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंटसवर ती सक्रीय झाली. प्रत्येक कामासाठी तिला पैसे मिळणार होते. सुरुवातीला तिने थोडे पैसे दिले, त्यावर तिला चांगले रिटर्न्स मिळाले. तिचा त्या ऑनलाइन सिस्टिमवर विश्वास बसला. तिने अजून जास्त पैसे कमावण्यासाठी गुंतवणूक सुरु केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
सुरुवातीला पैसे मिळाले
जॉब ऑफरच्या लिंकवर क्लिक करुन तिला सुरुवातीला विश्वास बसला. त्यातून तिने सुरुवातीला पैसे कमावले. पण नंतर तिने 12.50 लाखापर्यंत गुंतवणूक केली. त्या गुंतवणूकीवर तिला काही रिटर्न्स मिळाले नाहीत. अखेरीस सोमवारी तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. आयपीसीच्या विविध कलमातंर्गत पोलिसांनी घोटाळेबाजांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.