Hariyana Murder : अनैतिक संबंधाच्या संशयातून हरियाणात दुहेरी हत्या; आधी पत्नीची हत्या, मग मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला !

आरोपी विश्वजीतने दोन महिन्यांपूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केली होती. 3 जून रोजी आरोपीने क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत पत्नीची हत्या केली होती.

Hariyana Murder : अनैतिक संबंधाच्या संशयातून हरियाणात दुहेरी हत्या; आधी पत्नीची हत्या, मग मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला !
लातूरमध्ये सासूची हत्या करुन जावयाची आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 11:22 PM

हरियाणा : हरियाणातील करनालमधील दुहेरी हत्याकांडा (Double Murder)चे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक (Arrest) केली आहे. विश्वजीत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. ज्या कुऱ्हाडीने त्याने मित्राची हत्या (Friend Murder) केली तीही पोलिसांनी जप्त केली. याआधी आरोपीने पत्नीची निर्घृण हत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजीतच्या वडिलांनी एकेकाळी विधानसभा निवडणूकही लढवली आहे. विश्वजीतची पूर्वी एक शाळा होती, ज्यामध्ये त्याचा मित्र केअर टेकर म्हणून काम करत होता. विश्वजीतला पत्नी आणि आपल्या मित्रामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, त्यामुळे त्याने या दोघांची हत्या केली.

दोन महिन्यांपूर्वी केली होती पत्नीची हत्या

आरोपी विश्वजीतने दोन महिन्यांपूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केली होती. 3 जून रोजी आरोपीने क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत पत्नीची हत्या केली होती. मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली. तिला उपचार न मिळाल्याने 5 जून रोजी तिचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी शाळेतच तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि राख कालव्यात फेकून दिली. कुटुंबीय आणि सासरचे लोक आरोपीच्या संपर्कात नव्हते, त्यामुळे पत्नीच्या मृत्यूची माहिती कोणालाच मिळाली नाही.

कुऱ्हाडीने वार करुन मित्राची हत्या

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने दोन महिन्यांनी अनैतिक संबंधांच्या संशयातून दारुच्या नशेत मित्राचीही कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. एवढेच नाही तर त्याचा प्रायव्हेट पार्टही 90 टक्के कापला. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपी विश्वजीत खोलीला कुलूप लावून दुसऱ्या खोलीत आपल्या दोन मुलांसह राहत होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधीच पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत विश्वजीतने पत्नीच्या हत्येचीही कबुली दिली. (Double murder in Haryana on suspicion of extramarital affair)

हे सुद्धा वाचा

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.