रात्री मित्रांबरोबर दारु पार्टी, सकाळी बलात्काराचा आरोप करुन तरुणीची आत्महत्या!
गुजरातमध्ये एका 19 वर्षीय मुलीने आत्महत्या केलीय. रात्री तिच्या मित्रांबरोबर तिने दारुची पार्टी केली आणि सकाळी माझ्यावर बलात्कार झाला म्हणून तिने आपल्या दुसऱ्या मित्रांना सांगितलं आणि काही वेळातच आत्महत्या केली. (Drunk party with friends at night, Girl commits suicide by accusing of rape in the morning)
गांधीनगर : गुजरातमध्ये एका 19 वर्षीय मुलीने आत्महत्या केलीय. रात्री तिच्या मित्रांबरोबर तिने दारुची पार्टी केली आणि सकाळी माझ्यावर बलात्कार झाला म्हणून तिने आपल्या दुसऱ्या मित्रांना सांगितलं आणि काही वेळातच आत्महत्या केली. वडोदरामधल्या घटनेने संपूर्ण गुजरात हादरुन गेलं आहे. (Drunk party with friends at night, Girl commits suicide by accusing of rape in the morning)
बलात्कार झाल्याचा मृत मुलीचा आरोप
वडोदरा येथील लक्ष्मीपुरा येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. तिची तीन मित्रांशी मैत्री होती. आत्महत्या करण्यापूर्वी मृत विद्यार्थ्यीनीने रात्री तीन मित्रांसह एका खोलीत दारु पार्टी केली होती. यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप मृत मुलीने केला.
पहिल्यांदा दारु पार्टी, नंतर बलात्काराचा आरोप, सकाळी व्हिडीओ बनवून आत्महत्या
सकाळी मुलीने आपल्या जवळच्या मित्राला फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओही बनवला. यानंतर मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवयात्रा संपवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थीनी शहरातील एका खासगी कंपनीत कामाला होती. काम करत-करत ती शिकत होती. सहा महिन्यांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री तिच्या खोलीत तिचे 2 मित्र आणि एका मैत्रिणीबरोबर तिने दारु पार्टी केली.
पोलिसांनी दोन जणांना ठोकल्या बेड्या, PM ची रिपोर्टची प्रतिक्षा
पार्टीमध्ये सगळ्यांनीच मद्यपान केलं होतं. मृत मुलीला दारुची दारुची चांगलीच झिंग आली. याचाच फायदा दिशांत नावाच्या युवकाने घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला, असा मृत मुलीचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
(Drunk party with friends at night, Girl commits suicide by accusing of rape in the morning)
हे ही वाचा :
क्षुल्लक भांडणावरुन मित्राला रुममध्ये बंद केलं, जबर मारहाण, सिगारेटचे चटके आणि करंटचे झटके दिले!
काकाचं मुंडकं कापून मला फोटो पाठवा, मागणी मान्य न केल्याने 15 वर्षांच्या मुलाची हत्या