Chhattisgad Women Beatened : भयानक ! पत्नी वारंवार माहेरी जायची, पतीचा राग अनावर; बोट घालून डोळाच बाहेर काढला !

सध्या आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपीला अंमली पदार्थांचे व्यसन आहे.

Chhattisgad Women Beatened : भयानक ! पत्नी वारंवार माहेरी जायची, पतीचा राग अनावर; बोट घालून डोळाच बाहेर काढला !
दिल्लीत दोन पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यातच भिडले
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 5:12 PM

छत्तीसगड : पत्नी वारंवार माहेरी जायची म्हणून संतापलेल्या पतीने बोट घालून पत्नीचा डोळा (Eye)च बाहेर काढल्याची भयानक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. महिलेला गंभीर अवस्थेत मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून उदयपूर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्ना (Attempt to Murder)चा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. सध्या आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपीला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. यामुळेच त्याचे पत्नीसोबत अनेकदा भांडण होत होते. देवीप्रसाद असे आरोपीचे नाव आहे.

आधी मारहाण केली, मग डोळा बाहेर काढला

छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील उदयपूर पोलीस स्टेशन अंतर्गत केशगवान देवीप्रसाद आणि मानमती हे दोघे कुटुंबासोबत राहत होती. केशगव्हाण येथील रहिवासी असलेल्या देवप्रसादने नशेच्या अवस्थेत घरी पोहोचून पत्नी मानमतीशी सारखी माहेरी का जाते ? यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद इतका वाढला की, आधी देवीप्रसादने पत्नी मानमतीला अर्धमेली होईपर्यंत मारहाण केली. त्यानंतर उजव्या डोळ्यात बोट घालून डोळा बाहेर काढला. एवढेच नाही तर त्याने डोळ्याच्या नसा कापल्या आणि मग डोळा आगीत टाकला. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या सासू आणि दिराने डायल 112 वर घटनेची माहिती दिली. डायल 112 च्या टीमने माहिती मिळताच पीडितेला प्रथम उदयपूरच्या रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तात्काळ अंबिकापूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. (Due to a family dispute, the husband beat his wife and put out her eye)

हे सुद्धा वाचा

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.