Jalna Crime | आधी कारमध्ये नेऊन ठार केलं, नंतर मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव, जालना जिल्ह्यात चाललंय काय ?
त्या केल्यानंतर आरोपींनी थोरात यांचा मृतदेह झाडाला लटकवून त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव केला. आरोपींच्या या धाडसामुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली असून या हत्येमुळे जिल्ह्यात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
जालना : जुन्या भांडणाचा राग धरत कारमध्ये नेऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील हातवण परिसरात घडली. आप्पा रघुनाथ थोरात असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपींनी थोरात यांचा मृतदेह झाडाला लटकवून त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव केला. आरोपींच्या या धाडसामुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली असून या हत्येमुळे जिल्ह्यात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून सखोल तपास केला जात आहे.
नेमकं काय घडलं होतं ?
मिळालेल्या माहितीनुसार आप्पा रघुनाथ थोरात यांचे संशयित आरोपी प्रभाकर पवार, संदीप राठोड, दिलीप राठोड, अंजू राठोड, रवी राठोड आणि अनिल राठोड यांच्याशी भांडण होते. थोरात यांचा दोन दिवसांपूर्वीच आरोपींशी वाद झाला होता. जुने भांडण तसेच दोन दिवसांपूर्वी वाद झाल्यामुळे राठोड यांचा काटा काढण्याचा चंग आरोपींनी बांधला. त्यानंतर पाचही आरोपींनी थोरात यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांचा खून केला.
आत्महत्या केल्याचा देखावा
आरोपींनी अनिल उर्फ आप्पा थोरात यांच्य़ाशी झालेल्या वादाचा राग मनात धरला. त्यांनी थोरात यांच्या दुचाकीसमोर कार उभी करत त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. तसेच आरोपींनी थोरात यांना जोरदार मारहाण करत त्यांना ठार केले. त्यानंतर आरोपींनी हातवण या परिसरातील झाडाला आप्पा थोरात यांचा मृतदेह लटकवून त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला.
ग्रामस्थांना मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला
थोरात यांची हत्या करून त्यांचा मृतदेह झाडाला लटकावल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हातवण परिसरातील ग्रामस्थाना थोरात यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी आर. डी. मोरे यांच्यासह इतर वरिष्ट पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपास सुरु केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात सुनील थोरात यांनी पोलिसात तक्रार दिलेली असून मौजपुरी पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच क्षुल्लक भांडणामुळे थेट हत्या केल्यामुळे जालना जिल्ह्यात नेमकं काय चाललं आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे.
इतर बातम्या :