मुंबई : कोटामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाचा धक्कादायक अंत झाला आहे. पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधांमुळे एका व्यक्तीने चुलत भावाची हत्या केलीये. हत्या करण्यापूर्वी तरुणाला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याची हत्या करुन रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आलं. आरोपीने सांगितले की मृत चुलत भावाचे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. याबाबत त्याने अनेकदा त्याला समज ही दिली होती. पण तो ऐकत नव्हता. यानंतर चुलत भावाने पुन्हा त्याच्या पत्नीशी अवैध संबंध सुरू ठेवल्याने त्याने अन्य दोन जणांच्या मदतीने त्याची हत्या करण्याचा कट रचला.
पोलिसांनी चोकशीसाठी पथक तयार केले. पोलिसांनी हत्येचा खुलासा करत मुख्य आरोपीसह ३ जणांना अटक केली. पोलिसांनी हत्येदरम्यान वापरलेली कारही जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या माहितीनुसार रामेश्वरचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्याने चुलत भाऊ रामेश्वरला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो मान्य करत नव्हता. त्यामुळे त्याने त्याची हत्या केली.
आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी एफएसएल टीम, फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथकाच्या मदतीने पुरावे गोळा केले आणि अखेर आरोपीला पकडण्यात यश आले.
पोलिस चौकशीत आरोपी सीतारामने सांगितले की, रामेश्वरला मारण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याला फक्त रामेश्वरला चांगलाच धडा शिकवायचा होता. त्यासाठी प्रथम आरोपीने रामेश्वरला दारू पाजली. यानंतर त्याला विवस्त्र करून बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली. रामेश्वरला मारहाण केल्यानंतर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला अर्धनग्न करून पळून गेले. मात्र गंभीर जखमी झाल्याने रामेश्वरचा मृत्यू झाला. आरोपी सीताराम डांगी याच्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एक बेकायदेशीर उत्खनन आणि दुसरे मारहाणीचे प्रकरण आहे.