नवऱ्याने वहिनीला पिझ्झा खाऊ घातला, त्यावरुन घरात नको ते घडलं, थेट गोळीबार
एक महिला जखमी झाली. तिला लगेच उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विषय पिझ्झावरुन झालेल्या भांडणाचा आहे.
साधा पिझ्झा मागवण्यावरुन घरात इतकं टोकाच भांडण झालं की, विषय थेट गोळीबारापर्यंत जाऊन पोहोचला. 17 ऑक्टोबरला घराच्या बाहेर गोळीबार झाला. त्यात एक महिला जखमी झाली. तिला लगेच उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विषय पिझ्झावरुन झालेल्या भांडणाचा आहे. नवऱ्याने वहिनीसाठी पिझ्झा मागवला. ते पत्नीला अजिबात सहन झालं नाही. तिने रात्रीच्या रात्री आपल्या चार भावांना घरी बोलवून घेतलं. दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी झाली. या सगळ्याच पर्यावसन गोळीबारात झालं, ज्यात वहिनी जखमी झाली. पूर्व दिल्लीच्या सीलमपूरमधील हे प्रकरण आहे.
गोळीबारात जखमी झालेल्या महिलेला कुटुंबीय लगेच रुग्णालयात घेऊन गेले. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. महिलेच्या पोटात गोळी लागली. डॉक्टरांनी ऑपरेशन करुन ती गोळी बाहेर काढली. सध्या महिला रुग्णालयात असून तिला लवकरच डिस्चार्ज मिळेल. सादियाच लग्न जीशन सोबत झालं. सादियाला दीर आणि जाऊ आहे. दोन्ही कुटुंबाच आपसात फारस पटत नाही. काही कारणांवरुन दोन्ही कुटुंबात भांडण आहे. बुधवारी जीशान घरी येताना पिझ्झा घेऊन आला. त्याने तो पिझ्झा छोटा भाऊ जावेदची पत्नी आणि त्याच्या मुलांना दिला. हे सगळं सादिया पाहत होती.
लगेच चार भावांना बोलवून घेतलं
नवऱ्याने जाऊबाईला पिझ्झा दिला हे सादियाला अजिबात आवडलं नाही. महिलेने रागाच्या भरात आपल्या भावांना बोलवून घेतलं. रात्री दीडच्या सुमारास सादियाचे चारही भाऊ तफसीर, शहजाद, गुलरेज आणि मुंतजीर आले. त्यांनी सादियाच्या वहिनीसोबत वाद घालायला सुरुवात केली. दोन्ही बाजूंमध्ये शिवीगाळ झाली. मारहाणीपर्यंत विषय गेला. त्याचवेळी मुंतजीरने बंदूक काढून गोळीबार केला. यात एक गोळी सादियाच्या जावेला लागली,