महाराष्ट्रात ईडीकडून मोठी कारवाई, देशभरात 50 शाखा असणाऱ्या सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त, काय आहे प्रकरण?

ED attach property: ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या महाराष्ट्रासह देशातील इतर शहरांमध्ये एकूण ५० शाखा आहेत. या सोसायटीत पावणेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी होत्या. एकूण तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवीदारांची अडकली आहे.

महाराष्ट्रात ईडीकडून मोठी कारवाई, देशभरात 50 शाखा असणाऱ्या सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त, काय आहे प्रकरण?
ed raid
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 10:05 AM

ED attach property: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यावेळी अमंलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. बीड येथील मुख्यालय असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीवर ही करवाई झाली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने सोसायटीची ३३३ कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. या प्रकरणात ४९ गुन्हे दाखल आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरी या कंपन्यांच्या जमिनी, इमारती, प्रकल्प आणि मशिनरीचा समावेश आहे. या मालमत्ता सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. सध्या ज्ञानराधाचा अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी कारागृहात आहेत.

काय आहे प्रकरण

सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीत २३१८ कोटी रुपयांचा अपहार करत ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळवल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. हे पैसे नंतर रोखीने काढून घेत त्याद्वारे त्यांनी वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचेही तपासात दिसून आले आहे. या प्रकरणात मनी लॉड्रिग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीनेही याचा तपास सुरू केला होता.

अनेक ठिकाणी गुन्हे दाखल

ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या महाराष्ट्रासह देशातील इतर शहरांमध्ये एकूण ५० शाखा आहेत. या सोसायटीत पावणेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी होत्या. एकूण तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवीदारांची अडकली आहे. ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे दाखल आहेत. ज्ञानराधा सोसायटीतून परदेशात पैसा गेल्याचा संशय तपास संस्थांना आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास ईडीकडे देण्यात आला.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी ईडीकडून मालमत्ता जप्त

अमंलबजावणी संचालनालयाने १० ऑक्टोबर रोजी ज्ञानराधाची मालमत्ता जप्त केली होती. एकूण १००२ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्तेवर टाच ईडीने आणली होती. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना येथील काही इमारती आणि भूखंड होते.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....