Paytm च काय होणार? ईडीने फास आवळला, ‘या’ प्रकरणात चौकशी सुरु
पेटीएमच बँकिंग युनिट पेटीएम पेमेंट्स बँकमध्ये उल्लंघन झाल्याचा संशय आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआई) कथितरित्या इंफोर्समेंट डायरेक्ट्रेटला चौकशी करायला सांगितलं आहे. सोमवारपर्यंत ईडीने कंपनी ऑपरेशनची प्राथमिक चौकशी सुरु केलीय.
नवी दिल्ली : पेटीएमच्या मागे सध्या संकटांची मालिका लागली आहे. आरबीआयने कथितरित्या ED ला पेटीएम बँकिंग यूनिटच्या पेटीएम पेमेंट्स बँकमध्ये संशयास्पद उल्लंघनाची चौकशी करायला सांगितलं आहे. ईडीने कंपनीच्या ऑपरेशनची प्रायमरी चौकशी सुरु केली आहे. मनी लॉन्ड्रिंगच हे प्रकरण आहे. अजूनपर्यंत संपूर्ण प्रकरणात कुठलही स्टेटमेंट समोर आलेलं नाही. सध्या ईडी आणि आरबीआयकडून चौकशी सुरु आहे. अन्य एजन्सीची गरज लागली, तर मदत घेतली जाईल. या सगळ्या प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप नसेल.
आरबीआयने ग्राहक हित डोळ्यासमोर ठेऊन हे पाऊल उचललय असं मिंटने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटलं आहे. ईडीने आरबीआयकडे पेटीएमशी संबंधित कागदपत्र मागितली आहेत. संपूर्ण प्रकरणाचा डिटेल अभ्यास केला जातोय.
यूपीआय सर्विस संकटात
कंपनी रेग्युलेटरच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करतेय, असं पेटीएमने म्हटलं आहे. वन97 कम्युनिकेशंस लिमिटेड आणि सहकारी पेटीएम पेमेंटस बँकबद्दल कुठलीही माहिती दडवून ठेवणार नाहीत. आम्हाला ईडीसह अन्य रेग्युलेटर आणि कायदेशीर यंत्रणांना माहिती आणि स्पष्टीकरण द्याव लागू शकतं. आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेवर प्रतिबंध घातला आहे. हा आदेश 29 फेब्रुवारीपासून प्रभावी होईल. वॉलेट आणि यूपीआय पेटीएम बँकेच्या अंतर्गत आहे. कंपनीची यूपीआय सर्विस संकटात आहे.
शेअरची घसरणीने सुरुवात
आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेला एक महिन्याची मुदत दिली आहे. ग्राहकांना कुठलाही त्रास होऊ नये, हा त्यामागे उद्देश आहे. बुधवारी शेअर बाजार सुरु होताच सकाळच्या सत्रात पेटीएमचा शेअर पुन्हा एकदा 10 टक्के घसरणीसह 342.4 रुपयावर पोहोचला. मॅक्वेरीने आधीच वन97 कम्युनिकेशन्सची रेटिंग तटस्थवरुन कमी करुन ‘अंडरपरफॉर्म’ केलं आहे.