Iqbal Kaskar : दादागिरी करणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या भावाला इकबाल कासकरला ED ने दिला जोरदार झटका

Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आता देशाबाहेर फरार आहे. पण इथे दादागिरी करणाऱ्या त्याच्या भावाला इकबाल कासकरला ईडीने जोरदार दणका दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयने ही कारवाई करुन थेट इशारा दिला आहे.

Iqbal Kaskar : दादागिरी करणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या भावाला इकबाल कासकरला ED ने दिला जोरदार झटका
iqbal kaskar
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 2:53 PM

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर भोवती अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने आपला फास आवळला आहे. इकबाल कासकरचा ईडीने जप्त केलेला ठाण्यातील फ्लॅट आता ईडीने ताब्यात घेतला आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे 2017 साली इकबाल कासकर विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. ही प्रॉपर्टी खंडणीच्या माध्यमातून बळकावण्यात आली होती. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्यांच्या इतर साथीदारांवर मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने कारवाई केली होती.

या कारवाईत ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या कासकरच्या फ्लॅटवर ईडीने जप्ती आणली होती. तो फ्लॅट आता ईडीने ताब्यात घेतला आहे, याबाबतची नोटीस देखील इडीने फ्लॅटच्या दारावर लावली आहे. घोडबंदर येथील कावेसर मधील नियोपोलीस टॉवरमध्ये कासकरने हा फ्लॅट घेतला होता. याची किंमत 75 लाख इतकी आहे. 2017 साली इकबाल कासकरने हा फ्लॅट बिल्डर सुरेश मेहता आणि त्याची फर्म दर्शन इंटरप्रायजेसला धमकावून घेतला होता.

सील तोडून घरात प्रवेश केला होता

याबाबत ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी शाखेत गुन्हा दाखल होता. खंडणी, धमकावणे, मनी लॉन्ड्रिंग आणि विविध गुन्ह्यांमध्ये इकबाल कासकर सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ईडीने कासकरचा जो फ्लॅट सील केलाय, त्यात कासकरच्या फॅमिलीने 15 दिवसांपूर्वी सील तोडून घरात प्रवेश केला होता, अशी माहिती इमारतीच्या सदस्यांनी दिली आहे.

नावावर प्रॉपर्टी करण्यासाठी बिल्डरवर दबाव

इकबाल कासकर आणि त्याचे सहकारी मुमताझ शेख आणि इसरार सईद यानी अनेक बिझनेसमनना धमकावून त्यांच्याकडून पैसे जमा केले होते तसेच त्यांची संपत्ती बळकावलेली. मुमताज शेखच्या नावावर प्रॉपर्टी करण्यासाठी बिल्डरवर दबाव टाकण्यात आला होता. तपास यंत्रणेने PMLA अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. खंडणीशी संबंधित अनेक आरोप होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.