ED Raid | ‘या’ बड्या काँग्रेस नेत्याच्या पत्नी विरोधात ED ची कारवाई, 45 लाखाची संपत्ती जप्त
ED Raid | दिव्यांगाना कृत्रिम अंग आणि उपकरण वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने वर्ष 2009-10 मध्ये डॉक्टर जाकिर हुसैन मेमोरियल ट्रस्टला 17 जिल्ह्यात कॅम्प लावण्यासाठी सब्सिडी दिली होती.
ED Raid | दिव्यांगाना कृत्रिम अंग आणि उपकरण वाटपात घोटाळा झाला. या प्रकरणात ईडीने काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांची चौकशी केली. डॉक्टर जाकिर हुसैन मेमोरियल ट्रस्टच्या घोटाळ्याशी संबंधित विषय आहे. त्यानंतर मेमोरियल ट्रस्ट विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरु झाली. फर्रुखाबादच्या या ट्रस्टवर केंद्र सरकारच्या योजनेचे 71.5 लाख रुपये हडपण्याचा आरोप आहे.
आर्थिक गुन्हे शाखा सुद्धा या प्रकरणाची चौकशी करत आहे. ईडीने हे प्रकरण टेकओवर केलय. त्यानंतर PMLA अंतर्गत गुन्हा दाखल होऊन चौकशी सुरु झाली. ईडीने 29.51 लाख रुपयांची 15 अचल संपत्ती जप्त रेली. यात कृषि भूमी आणि 4 बँक खात्यात जमा 16.41 लाख रुपये आहेत. हे प्रकरण टेकओवर करुन ED ने PMLA अंतर्गत कारवाई सुरु केलीय.
71.5 लाख रुपयांची सब्सिडी दिलेली
सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने वर्ष 2009-10 मध्ये डॉक्टर जाकिर हुसैन मेमोरियल ट्रस्टला 17 जिल्ह्यात कॅम्प लावून दिव्यांगाना कृत्रिम अंग आणि उपकरण वितरित करण्यासाठी 71.5 लाख रुपयांची सब्सिडी प्रदान केली होती. या प्रकरणात पोलिसांनी मेमोरियल ट्रस्टच्या योजनेचे संचालक लुईस खुर्शीद, ट्रस्टचे सचिव मोहम्मद अतहर फारुकी व ट्रस्टचे प्रतिनिधि प्रत्यूष शुक्ला विरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल केलं.
या प्रकरणी अजून चौकशी सुरु
या प्रकरणी वर्ष 2017 मध्ये फर्रुखाबादसह अन्य शहरात ट्रस्टच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याआधारे ईडी मनी लॉन्ड्रिंग एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन चौकशी करत आहे. कृत्रिम अंग व उपकरण वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप ट्रस्टवर लावण्यात आला होता. उपकरणांसाठी देण्यात आलेल्या रक्कमेचा व्यक्तीगत वापर झाल्याच चौकशीत समोर आलं होतं. या प्रकरणी अजून चौकशी सुरु आहे.