Ekta Murder Case: श्रीमंत महिलांना प्रोटीन शेकमध्ये नशेच्या गोळ्या देऊन ब्लॅकमेल करत होता जिम ट्रेनर, 11 महिलांच्या संपर्कात

Ekta Gupta Murder Case: एकता गुप्ता ही रोज ग्रीन पार्कमध्ये असलेल्या जिममध्ये जात होती. नेहमीप्रमाणे 24 जून रोजी सकाळी ती जिममध्ये गेली. त्यानंतर परत आलीच नाही. तिचा तपास लागला नाही. यामुळे तिच्या कुटुंबियांनी पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दाद मागितली.

Ekta Murder Case: श्रीमंत महिलांना प्रोटीन शेकमध्ये नशेच्या गोळ्या देऊन ब्लॅकमेल करत होता जिम ट्रेनर, 11 महिलांच्या संपर्कात
Ekta Murder Case
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 9:59 AM

 Ekta Murder Case: एका विवाहीत महिलेच्या हत्या प्रकरणात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कानपूरमधील एकता गुप्ता हत्या प्रकरणाचे राज चार महिन्यांनी समोर आले आहे. या प्रकरणात जिम ट्रेनर विमल सोनी याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि कॉल डिटेल्स समोर आले आहे. त्यानुसार, प्रशिक्षणादरम्यान तो श्रीमंत महिलांच्या जवळ जात होता. त्यामुळे अनेक महिलांनी विमलच्या आर्थिक गरजाही पूर्ण केल्या. प्रोटीन शेकमध्ये नशेच्या गोळ्या टाकून तो महिलांना ब्लॅकमेल करत होता. 11 महिला त्याच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे.

एनर्जी ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या

एकता हत्याकांड प्रकरणात जिम ट्रेनर विमल सोनी आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचे मोबाईल फोनचे कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर) काढले. त्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट काढले. त्यातून तो महिलांशी अश्लील चॅटींग करत असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात तो एनर्जी ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या देत होता. तो महिलांना ‘सप्लिमेंट’ म्हणजे जिममध्ये एनर्जी ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या टाकून देत होता. त्यानंतर काही महिलांना नशेची सवय लागली. त्या त्याच्या संपर्कात आल्या.

काय होता प्रकार

सिव्हिल लाइन्सच्या गोपाल विहारमध्ये राहणारी एकता गुप्ता ही रोज ग्रीन पार्कमध्ये असलेल्या जिममध्ये जात होती. नेहमीप्रमाणे 24 जून रोजी सकाळी ती जिममध्ये गेली. त्यानंतर परत आलीच नाही. तिचा तपास लागला नाही. यामुळे तिच्या कुटुंबियांनी पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दाद मागितली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. तब्बल चार महिन्यांनंतर शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी विमल सोनी याला अटक करण्यात आली. त्यानंतर या हत्येचे गुपित उघड झाले.

हे सुद्धा वाचा

काय घडले त्या दिवशी

24 जून रोजी एकता जिममध्ये सकाळी आली. विमल तिला बोलण्यासाठी कारमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याने एकताला मारहाण सुरु केली. त्यानंतर एकताचा दोरीने गळा आवळून खून केला. यानंतर त्यांनी सकाळी 8.15 च्या सुमारास जिल्हाधिकारीच्या निवासस्थानाशेजारी असलेल्या ऑफिसर्स क्लबमध्ये जाऊन खड्डा खणून मृतदेह पुरला. पोलिसांनी त्या ठिकाणी उत्खनन केले. त्यांना एकताचा सांगाडा सापडला. पोलिसांना विमलचे दोन फोन सापडले आहेत. विमलने एकताचा फोन तोडून बिथूरजवळ फेकून दिला होता.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.