Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Death : सोलापुरात आईला मारले म्हणून मुलगा आणि मेव्हण्याने बापाला चोपले, मारहाणीत वृध्दाचा मृत्यू; दोघांना अटक

आईला मारल्यामुळे संतापलेल्या मुलाने वडिलांना झाडाला बांधून काठीने जबर मारहाण केली. तसेच बहिणीला मारल्याच्या रागातून थोरात यांच्या मेव्हण्यानेही मयतास शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केली.

Solapur Death : सोलापुरात आईला मारले म्हणून मुलगा आणि मेव्हण्याने बापाला चोपले, मारहाणीत वृध्दाचा मृत्यू; दोघांना अटक
सोलापुरात आईला मारले म्हणून मुलगा आणि मेव्हण्याने बापाला चोपलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 7:51 PM

सोलापूर : आईला दारू पिऊन मारहाण करतो म्हणून मुलाने वडिलांना नारळाच्या झाडाला बांधून मारहाण (Beating) केली. त्यानंतर मुलाच्या मामानेही मारहाण केल्याने एका वृध्दाचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांचा गाडीवरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिस तपासात हा मृत्यू गाडीवरुन पडल्यामुळे नसून मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे हा प्रकार घडला आहे. शिवाजी थोरात असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी मंद्रूप पोलिसांनी मुलगा आणि मेहुणा या दोघांविरोधात 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक (Arrest) केली आहे. तानाजी शिवाजी थोरात आणि भीमराव रामचंद्र जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे नेमकी घटना ?

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावात थोरात कुटुंबीय राहतात. मयत शिवाजी थोरात यांना दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत शिवाजी थोरात यांनी घरगुती भांडणाच्या रागातून पत्नीला कुर्‍हाडीने पाठीवर मारले होते. यात पत्नी जखमी झाली. आईला मारल्यामुळे संतापलेल्या मुलाने वडिलांना झाडाला बांधून काठीने जबर मारहाण केली. तसेच बहिणीला मारल्याच्या रागातून थोरात यांच्या मेव्हण्यानेही मयतास शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केली. या मारहाणीत थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.

आधी दुचकीवरुन पडल्याचा केला बनाव, पोलीस तपासात सत्य उघड

थोरात यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना घरी आणून पलंगावर झोपवले. दुचाकीवरुन पडून वडिलांचा मृत्यू झाल्याचा बनाव करत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलाची फिर्याद नोंदवून प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासात थोरात यांचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी मुलगा तानाजी थोरात आणि मेव्हणा भीमराव जाधव यांच्याविरोधात कलम 302, 324, 342, 504, 34 प्रमाणे मंद्रूप पोलिसात गुन्हा नोंद केला.दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (Elderly man dies after being beaten by son and brother in law in Solapur)

हे सुद्धा वाचा