‘सैतान होती, देवानं मारायला सांगितलं’! जन्मदात्या आईचं शिर धडावेगळं करणाऱ्या मुलाचा धक्कादायक जबाब

एका मुलाने आईचं शिर धडावेगळं केल्याची धक्कादायक घटना ब्रिटनध्ये घडलीय. इतकंच नाही तर त्याने जन्मदात्या आईच्या शरिराचे 11 तुकडे केल्याचं समोर आलंय. धक्कादायक बाब ही की आरोपी आपल्या आईला सैतान समजत होता. या हत्येच्या आरोपाखाली कोर्टाने आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

'सैतान होती, देवानं मारायला सांगितलं'! जन्मदात्या आईचं शिर धडावेगळं करणाऱ्या मुलाचा धक्कादायक जबाब
क्राईम
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 7:11 PM

नवी दिल्ली : एका मुलाने आईचं शिर धडावेगळं केल्याची धक्कादायक घटना ब्रिटनध्ये घडलीय. इतकंच नाही तर त्याने जन्मदात्या आईच्या शरिराचे 11 तुकडे केल्याचं समोर आलंय. धक्कादायक बाब ही की आरोपी आपल्या आईला सैतान समजत होता. या हत्येच्या आरोपाखाली कोर्टाने आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रांनी याबाबतचे वृत्त छापले आहे. (Elderly mother murdered by man in UK, accused sentenced to life imprisonment)

मिळालेल्या माहितीनुसार 41 वर्षीय अर्नेस्ट ग्रुजा नावाच्या आरोपीने आपली 59 वर्षीय आई विस्लावा निर्जेजेस्का यांची राहत्या प्लॅटमध्ये हत्या केली. त्याने आईच्या शरिराचे 11 तुकडे केले. इतकंच नाही तर आईचं शिरही धडावेगळं केलं. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आईच्या शरिराचे तुकडे अलमारी आणि फ्रिजमध्ये ठेवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस जेव्हा घटनास्थळावर दाखल झाले तेव्हा आरोपी आईचं शिर हातात घेऊन बसला होता!

‘घरातील स्थिती पाहून पोलिसही चक्रावले’

क्रेंब्रिज क्राऊन कोर्टातील वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अर्नेस्ट 22 फेब्रुवारी रोजी जेव्हा बाजूच्या दुकानात गेला तेव्हा त्या दुकानदाराला शंका आली. कारण, आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. दुकानदाराने पोलिसांना त्याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांची एक टीम आरोपीच्या घरी पोहोचली. त्यावेळी घरातील सर्व स्थिती पाहून पोलिसही चक्रावून गेले होते.

पोलिस अधिकाऱ्यांनी जेव्हा घरात तपास केला तेव्हा आरोपीने फ्रिज आणि अलमारीमध्ये ठेवलेले आईच्या शरिराचे तुकडे सापडले. तर किचनच्या खिडकीजवळ आरोपी आईचं धडावेगळं केलेलं शिर हातात घेऊन बसलेला पाहायला मिळाला.

आई सैतान असल्याच्या दाव्यातून मुलाकडून हत्या!

आरोपी अर्नेस्टला वाटत होतं की त्याची आई सैतान आहे. सैतानाची हत्या करुन त्याच्या शरिराचे तुकडे करण्यासाठी देवानंच सांगितल्याचं अर्नेस्टने सांगितलं. तसंच त्याला विश्वास होता की, तो आईच्या शरीरावर पवित्र जल आणि रक्त टाकल्यानंतर ती पुन्हा जिवंत होईल. वकिलांनी अर्नेस्ट हा मानसिक रुग्ण असल्याचं सांगितलं.

दरम्यान, कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, त्याची मानसिक अवस्था पाहता त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला आजीवर रुग्णालयात राहूनच शिक्षा भोगावी लागू शकते.

इतर बातम्या :

गुड गोईंग… मुख्यमंत्र्यांकडून मलिकांचं कौतुक; तर वरिष्ठांनी मलिकांना थांबवावं, संजय राऊतांचं आवाहन

‘गरीबांना लुटायचे आणि उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम’, नाना पटोलेंचा घणाघात

Elderly mother murdered by man in UK, accused sentenced to life imprisonment

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.