वीज चोरीचा आकडा बघून हाय व्होल्टेजचा करंट लागेल; तरीही महावितरण म्हणतं अजून गुन्हाच दाखल करु

इचलकरंजीः इचलकरंजी शहरातील (Ichalkaranji) लिंबू चौक परिसरातील राहणाऱ्या एका यंत्रमाग धारकाने महावितरणची वीज चोरी (Power theft) केल्याप्रकरणी सलमान चिंचले यांना नोटीस बजावली आहे. 97 लाख 22 हजार 26 रुपयांची वीज चोरली केली असल्याचे निदर्शनास आले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने आठ दिवसांपूर्वी ही चोरी पकडली होती. यामध्ये मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. […]

वीज चोरीचा आकडा बघून हाय व्होल्टेजचा करंट लागेल; तरीही महावितरण म्हणतं अजून गुन्हाच दाखल करु
इचलकरंजीत 97 लाख 22 हजार 26 रुपयांची वीज चोरी
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 12:10 AM

इचलकरंजीः इचलकरंजी शहरातील (Ichalkaranji) लिंबू चौक परिसरातील राहणाऱ्या एका यंत्रमाग धारकाने महावितरणची वीज चोरी (Power theft) केल्याप्रकरणी सलमान चिंचले यांना नोटीस बजावली आहे. 97 लाख 22 हजार 26 रुपयांची वीज चोरली केली असल्याचे निदर्शनास आले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने आठ दिवसांपूर्वी ही चोरी पकडली होती. यामध्ये मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आज महावितरणच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांनी सलमान चिंचले यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अठ्ठेचाळीस तासाच्या आत पैसे भरावे अन्यथा आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आदेश बजावले आहेत.

इचलकरंजी शहरामध्ये एका यंत्रमाग धारकाने वीज चोरल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. भरारी पथकाने छापा टाकून ही चोरी पकडली असून आज महावितरणचे अधिकाऱ्यांनी चिंचले यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

महावितरणकडून धाड

गेल्या काही दिवसामध्ये असे अनेक प्रकार घडले आहेत, त्यामुळे वारंवार जर इचलकरंजीमध्ये असे प्रकार होत असतील तर महावितरणकडून धाड टाकण्याची मोहीम राबवणारी असल्याचेही चर्चा आहे.

अनेकदा वीज चोरी

इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग आहेत. त्यामुळे विजेचाही मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. त्यामुळे वीज मोठ्या प्रमाणात लागत असल्याने अनेकदा वीज चोरी होत असते. त्यामुळे हे प्रकार अनेकदा उघडही झाले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असेल तर संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

विजेची मागणी मोठी

इचलकरंजी विभागात विजेची मागणी मोठी आहे. महावितरणला पॉवरलूमसह औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापराची सविस्तर माहिती ऑनलाईन मिळते. त्यामुळे माहितीच्या आधारे गळती असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करून वीज चोरी उघडकीस आणली आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.