Nusrat jahan | प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ मोठ्या संकटात

Nusrat jahan | नुसरत जहाँ यांच्यावर काय संकट आलय?. चौकशीत सहकार्य करु, असं अभिनेत्रीने सांगितलय. अनेक वरिष्ठांची फसवणूक केल्यााच आरोप करण्यात आला होता.

Nusrat jahan | प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ मोठ्या संकटात
nusrat jahanImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 12:18 PM

कोलकता : तृणमुल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ अडचणीत आल्या आहेत. मंगळवारी सकाळी नुसरत जहाँ सॉल्टलेक सीजीओ कॉम्प्लेक्स येथील ईडीच्या कार्यालयात आल्या. फ्लॅटच्या एका व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने नुसरत जहाँ यांची चौकशी सुरु केली आहे. 2 खोल्यांचा फ्लॅट देण्यासाठी 500 लोकांकडून पैसे घेण्याचा आरोप आहे. पण इतका वेळ होऊनही अजूनही फ्लॅट देण्यात आलेला नाही. बशीरहाट येथून नुसरत जहाँ खासदार आहेत. त्यांनी फसवणुकीचे आरोप फेटाळून लावले आहेत. चौकशीत सहकार्य करु, असं अभिनेत्रीने सांगितलय. नुसरत जहाँ यांच्यावर फ्लॅट विक्रीच्या नावाखाली अनेक वरिष्ठांची फसवणूक केल्यााच आरोप करण्यात आला होता. भाजपा नेते शंकुदेव पांडा तक्रारकर्त्यांसह तक्रार करण्यासाठी गरियाहाट पोलीस स्टेशन आणि सॉल्ट लेक सीजीओ कॉम्प्लेक्स येथील ईडी कार्यालयात गेले होते.

गरियाहाट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. नुसरत जहाँ यांनी त्या फसवणुकीच्या पैशातून पाम एवेन्यूमध्ये फ्लॅट विकत घेतल्याच बोललं जातं. अलीपूर कोर्टात खटला दाखल केला होता. त्या तक्रारीच्या आधारावर कोलकात्ता पोलीस आणि ईडीने तपास सुरु केला. ईडीने याआधी सुद्धा तृणमुल खासदार आणि अभिनेत्रीला समन्स पाठवलं आहे. नुसरत जहाँ यांनी कोलकाता प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी तक्रार दाखल होण्याआधी कंपनीशी नात तोडलं होतं असं सांगितलं. मी संबंधित कंपनीकडून अनेक कोटी रुपयांच कर्ज घेतलं होतं. मी त्या कर्जाचे पैसे चुकवले आहेत असं नुसरत जहाँ यांनी सांगितलं. नुसरत जहाँ यांनी किती कर्ज घेतलं होतं?

नुसरत जहाँ यांनी त्या कंपनीकडून 1 कोटी 16 लाख 30 हजार 285 रुपयाच कर्ज घेतलं होतं. 2017 मध्ये व्याजासह 1 कोटी 40 लाख 71 हजार 995 रुपये परत केले. बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी खासगी कंपनीकडून कर्ज का घेतलं? असा प्रश्न नुसरत जहाँ यांना विचारण्यात आला. त्यावर तृणमुल खासदार नुसरत जहाँ पत्रकार परिषद सोडून निघून गेल्या होत्या. ईडीने काही पुरावे गोळा केले. तक्रारकर्त्यांबरोबर चर्चा केली. त्यांची जबानी नोंदवून घेतल्यानंतर नुसरत जहाँ यांना चौकशीसाठी बोलावल होतं. नुसरत त्याविरोधात कोर्टात गेल्या होत्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.