Delhi Knife Attack : कौटुंबिक वादातून इंजिनिअरने पत्नी, सासूसह मुलीला चाकूने भोसकले; दिल्लीतील खळबळजनक घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर विहार फेज-1 एक्स्टेंशनच्या मानस अपार्टमेंटमध्ये चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना घरात दोन महिला आणि एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या.
दिल्ली : कौटुंबिक वादातून एका इंजिनिअरने पत्नी, सासूसह आपल्या 8 वर्षाच्या मुलीला चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना दिल्लीतील हायप्रोफाईल परिसरात घडली आहे. या हल्ल्या (Attack)त तिघीही जखमी (Injured) झाल्या असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघींची प्रकृती चिंताजनक (Critical) आहे. पती-पत्नीमध्ये आधीपासून वाद आहे. पोलिसांनी आरोपी अभियंत्याला अटक केली असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. सिद्धार्थ शर्मा(37) असे आरोपी इंजिनियरचे नाव आहे. तर आदिती शर्मा (35) आणि माया देवी (60) अश जखमी महिलांची नावे आहेत.
घरगुती वादातून घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर विहार फेज-1 एक्स्टेंशनच्या मानस अपार्टमेंटमध्ये चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना घरात दोन महिला आणि एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. तिघींनाही तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. चौकशीत अभियंता पतीने ही घटना घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. रविवारी सिद्धार्थचा पत्नी अदितीशी घरात वाद झाला. रागाच्या भरात त्याने आदितवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर अदितीची आई माया देवी आणि त्याची स्वतःची 8 वर्षांची मुलगी यांनाही चाकूने भोसकले. तिघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना धर्मशिला रुग्णालयात दाखल केले.
पती-पत्नीकडून एकमेकांविरोधात अनेक खटले दाखल
सिद्धार्थ आणि आदितीने दिवाणी व कौटुंबिक प्रकरणी एकमेकांविरुद्ध न्यायालयात अनेक खटले दाखल केले आहेत. यामुळे सिद्धार्थ तणावाखाली होता आणि त्याने संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. सिद्धार्थ हा गुरुग्राममधील एका कंपनीत टेक्निकल सपोर्ट इंजिनीअर आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी सिद्धार्थला अटक करण्यात आली. (Engineer stabbed wife, mother-in-law and daughter due to family dispute)