CCTV | एक्स बॉयफ्रेण्डचा तरुणीवर भररस्त्यात चाकू हल्ला, सीसीटीव्ही हादरवणारी दृश्यं कैद
दिल्लीच्या बिंदापूरमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा ही घटना घडली. मुलीवर चाकू हल्ला होतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. अंकित असं आरोपीचं नाव आहे. पीडित तरुणी आरोपीची एक्स-गर्लफ्रेंड होती.
नवी दिल्ली : एक्स बॉयफ्रेण्डने तरुणीवर चाकूने हल्ला केल्याचा (Lover Attacks On Girl) धक्कादायक राजधानी दिल्लीत प्रकार समोर आला आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. मात्र ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या बिंदापूरमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा ही घटना घडली. मुलीवर चाकू हल्ला होतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. अंकित असं आरोपीचं नाव आहे. पीडित तरुणी आरोपीची एक्स-गर्लफ्रेंड होती.
सीसीटीव्हीमध्ये काय दिसतं?
सीसीटीव्हीमध्ये 3 तरुण दिसत आहेत. अचानक बाचाबाची झाल्यानंतर आरोपी तरुणीवर चाकूने एकामागून एक वार करत असल्याचे दिसते. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तरुणी जमिनीवर पडते. त्यानंतरही तरुण तिचे केस पकडून तिच्यावर हल्ला करत राहतो
सीसीटीव्हीमध्ये दिसणारे दोन तरुण आरोपीला थांबवताना दिसत आहेत. ते त्याला हल्ला करण्यापासून रोखत आहेत. मात्र हल्ला करणारा तरुण सतत तिला भोसकत राहतो.
दुसरीकडे, एक तरुण शांतपणे संपूर्ण घटना पाहत उभा आहे. नंतर, मुलगी जखमी अवस्थेत रडत त्या तरुणाकडे जाते. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स बॉयफ्रेण्ड अंकितने तरुणीवर हल्ला केला आहे.
पाहा व्हिडीओ :
दिल्ली के बिंदापुर में सिरफिरे आशिक़ ने लड़की पर चाकू से हमला किया। हमले में लड़की की मौत। दो लड़के आरोपी से लडकी को बचाने की कोशिश भी कर रहे है लेकिन आरोपी अंकित हमला कर फ़रार हो गया। pic.twitter.com/ujOuHOkXH1
— जितेंद्र शर्मा (@capt_ivane) October 19, 2021
संबंधित बातम्या :