माजी नौदल अधिकाऱ्याचा पाच जणींवर बलात्कार, दुष्कृत्यानंतर मेसेज करायचा, ‘पुन्हा कधी येऊ?’

आरोपी नौदलाचा माजी अधिकारी आहे. या नराधमाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पाच जणींपैकी तिघी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याची माहिती आहे. ब्रिटीश कोर्टाकडून आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे

माजी नौदल अधिकाऱ्याचा पाच जणींवर बलात्कार, दुष्कृत्यानंतर मेसेज करायचा, 'पुन्हा कधी येऊ?'
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 9:50 AM

Tinder rapist arrested : टिंडर या डेटिंग अॅपवर ( Tinder Dating App) एका पुरुषाने एक-दोन नव्हे, तर तब्बल 5 महिलांवर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आधी हा नराधम डेटिंग अॅपवर महिलांशी ओळख वाढवायचा. चॅटिंग करुन त्यांच्याशी मैत्री करायचा. त्यानंतर हळूहळू गोड बोलून त्यांच्यावर गारुड घालायचा. अखेर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. ब्रिटनमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी नौदलाचा माजी अधिकारी आहे. या नराधमाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पाच जणींपैकी तिघी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याची माहिती आहे. ब्रिटीश कोर्टाकडून आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टानेही टॉम रॉडवेल (Tom Rodwell) यां 31 वर्षीय आरोपीचं वर्णन हैवान या शब्दात केलं आहे.

हैवानाला लाजवणारा आरोपी

‘द सन’च्या वृत्तानुसार, टॉम रॉडवेल ब्रिटनचा रहिवासी आहे. तो रॉयल नेव्हीमधून सेवानिवृत्त झाला आहे. 31 वर्षीय टॉमने पाच जणींवर 11 वेळा बलात्कार केल्याचं कोर्टात कबूल केलं आहे. शारीरिक संबंध ठेवताना तो हिंसक व्हायचा. एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर तर त्याने तिला एक घृणास्पद मेसेजही केला होता, ज्यामध्ये त्याने ‘मी तुझ्यावर पुन्हा बलात्कार करायला कधी येऊ?’ असा अंगावर शिसारी आणणारा प्रश्न विचारला होता.

एका पीडितेने सांगितले की, रॉडवेलच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत. त्याला पाहून जणू राक्षस-हैवानांचाच भास होतो. तर एक पीडिता म्हणाली की, ‘मला वाटलं होतं तो मला जीवानिशी मारुन टाकेल, कारण त्याने कोणाला तरी ठार मारलं होतं.’

जजही म्हणाले, हा समाजासाठी धोकादायक

टीसाईड क्राउन कोर्टात (Teesside crown court) आरोपीविरुद्धच्या खटल्याची सुनावणी झाली असता, पीडित तिन्ही महिला त्याच्या विद्यार्थिनी असल्याचे आढळून आले. मिडल्सब्रो (Middlesbrough) येथे राहणारा रॉडवेल महसूल आणि सीमाशुल्क विभागात कार्यरत होता. त्यापूर्वी त्याने नौदलातही काम केले होते. जज पॉल वॉटसन यांनी सुनावणीदरम्यान त्याचे वर्णन ‘धोकादायक व्यक्ती’ असे केले.

संबंधित बातम्या :

Pune Murder | अंगणात कोंबड्या आल्यावरुन वाद, बारामतीत महिलेची निर्घृण हत्या

86 व्या वर्षी वडिलांनी मॅरेज ब्युरोत नाव नोंदवलं, पुण्यात पोराने बापालाच संपवलं

हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर, 22 वर्षीय तरुणासह बापालाही संपवलं, पुण्यातील शाळेमागे हत्याकांड

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.