कारगिल युद्धातील शहिदाच्या पित्याचीच ऑनलाइन लाखोंची फसवणूक; 71 वर्षीय माजी सैनिकाची लुटली आयुष्यभराची शिदोरी

माजी सैनिक तीर्थराज द्विवेदी यांनी सांगितले की, पैसे काढल्यानंतर मलबार हिल सायबर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

कारगिल युद्धातील शहिदाच्या पित्याचीच ऑनलाइन लाखोंची फसवणूक; 71 वर्षीय माजी सैनिकाची लुटली आयुष्यभराची शिदोरी
ऑनलाइनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 10:58 PM

मुंबई : बँक खाच्याची केवायसी (KYC) अपडेट करावी लागेल, आपल्याला एक ओटीपी क्रमांक पाठवला आहे, तो लवकर सांगा. जर तुम्ही लवकरच ओटीपी क्रमांक दिला नाही, तर तुमच्या खात्यातील सर्व पैसे जप्त केले जातील म्हणत एका ठगाने माजी सैनिकालाच (Ex-Serviceman) लुटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मलबार हिल सायबर पोलिसात (Malabar Hill Cyber Police) एफआयआर दाखल करण्यात आली असून 71 वर्षीय माजी सैनिकाची आयुष्यभराची शिदोरी ठगाने ऑनलाइन उडवून नेली. तीर्थराज सूर्यप्रसाद द्विवेदी असे 71 वर्षीय माजी सैनिकांचे नाव आहे.

मुलगा ही कारगिल युद्धात शहीद

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 71 वर्षीय माजी सैनिक तीर्थराज सूर्यप्रसाद द्विवेदी हे मुंबईत राहतात. तर ड्रायव्हरची नोकरी करून आपला खर्च चालवतात. तीर्थराज सूर्यप्रसाद द्विवेदी हे 1965 ते 1985 या काळात देशासाठी सैन्यात कार्यरत होते. तर त्यांचा मुलगा हा देखील हवाई दलात होता. जो 1998 मध्ये कारगिल युद्धात शहीद झाला. त्यामुळे सध्या तीर्थराज हे मुंबईत एकटेच राहतात.

1 लाख 38 हजार रुपयांचे व्यवहार

दरम्यान तीर्थराज यांना 25 मे रोजी राहुल कुमार शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला. आणि मी बीओबी बँकेच्या दिल्ली मुख्य कार्यालयातील केवायसी व्यवस्थापक बोलतोय, असे सांगितले. तसेच तुम्हाला तुमच्या खात्याचे केवायसी अपडेट करावे लागेल असेही सांगितले. त्याचबरोबर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक पाठवला आहे, तो लवकर सांगा अन्यथा तुमच्या खात्यातील सर्व पैसे जप्त केले जातील असे सांगितले. त्यानंतर तीर्थराज घाबरले आणि त्यांनी OTP नंबर दिला. OTPनंबर दिल्यानंतर त्याच्या खात्यातून तीन वेळा 1 लाख 38 हजार रुपयांचे व्यवहार झाले.

हे सुद्धा वाचा

माजी सैनिक तीर्थराज द्विवेदी यांनी सांगितले की, पैसे काढल्यानंतर मलबार हिल सायबर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एवढेच नाही तर या माजी सैनिकाने पोलीस आणि अनेक नेत्यांना आपले पैसे परत मिळावेत, असे आवाहनही केले आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.