सिव्हिलच्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणाला धक्कादायक वळण लागणार? शहर हद्दीत गुन्हा वर्ग झाल्यानं चर्चेला उधाण

जिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी यांच्यासहित इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पोलीस कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट प्रमाणपत्र बनवून दिले जात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती.

सिव्हिलच्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणाला धक्कादायक वळण लागणार? शहर हद्दीत गुन्हा वर्ग झाल्यानं चर्चेला उधाण
प्रेमाला विरोध करणाऱ्या भावाला प्रियकराच्या मदतीने संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 2:58 PM

नाशिक : गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये बनावट प्रमाणपत्राचं ( Fake Certificate )  समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र आता याच प्रकरणाला धक्कादायक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकच्या तालुका पोलीस ठाण्यात हद्द नसतांनाही गुन्हा दाखल करण्यात आल्याने ग्रामीण पोलीसांच्या ( Nashik Police ) भूमिकेवरच संशय घेतला जात आहे. नुकताच जिल्हा रुग्णालयातील बनावट प्रमाणपत्राचा गुन्हा आडगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या पथकाच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास आता केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी पोलीसांच्या तपासात काय निदर्शनास येणार याची चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली आहे.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याचा प्रकार समोर आला होता, नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी हे प्रकरण समोर आणले होते.

जिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी यांच्यासहित इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पोलीस कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट प्रमाणपत्र बनवून दिले जात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणी नाशिकच्या तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासहित इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे गुन्ह्यात आढळून आले होते.

ग्रामीण पोलीसांनी हद्द नसतांना गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये ऑगस्ट 2022 मध्ये हे संपूर्ण प्रकरण समोर आले होते.

जवळपास 21 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याशिवाय जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांचाही समावेश होता. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण नाशिक जिल्ह्यातच नाही राज्यात चर्चेत आले होते.

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून आदेश आल्यानंतर हा गुन्हा शहर हद्दीत वर्ग करण्यात आला आहे. हा गुन्हा ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत दाखल करण्यामागील कारण काय याचाही सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती आहे.

तत्कालीन पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी कारवाई केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली होती. परंतु आता शहर पोलीस हद्दीतील आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

जिल्हा रुग्णालयात या बनावट प्रमाणपत्र प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जामीन मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. तर दुसऱ्या बाजूला पोलीस त्यांच्यावर मागावर असल्याचे चित्र होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.