लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, जबरदस्ती गर्भपात करायला भाग पाडलं, प्रसिद्ध अभिनेत्रीचा माजी मंत्र्यांवर गंभीर आरोप
एका प्रसिद्ध अभिनेत्रीने माजी मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे (Famous actress accuses former minister of sexual harassment).
चेन्नई : तामिळनाडूमध्ये सध्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झालाय. कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने माजी मंत्री आणि अण्णा द्रमुकचे नेते मणिकंदन यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे विरोधकांना आयतं कोलितच सापडलं आहे. “मणिकंदन यांनी लग्नाचे आमिष दाखवून जवळपास पाच वर्ष लैंगिक शोषण केलं. मणिकंदन यांच्यासोबत प्रेमसंबंधातून गर्भवती झाली. मात्र, त्यांनी जबरदस्ती गर्भपात करायला भाग पाडलं”, असा दावा पीडित अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीच्या या आरोपांमुळे तामिळनाडूत एकच खळबळ उडाली आहे (Famous actress accuses former minister of sexual harassment).
अभिनेत्री मुळची मलेशियाची
पीडित अभिनेत्रीने पुरावे म्हणून मणिकंदन यांच्यासोबत काही खासगी फोटो पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. पीडित अभिनेत्री ही मुळची मलेशियाची आहे. तिचं कुटुंब हे मलेशियात वास्तव्यास आहे. ती गेल्या काही वर्षांपासून तामिळ चित्रपटांमध्ये काम करत आहे. ती मणिकंदन यांच्यासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंधात होती, असा दावा अभिनेत्रीने केला आहे (Famous actress accuses former minister of sexual harassment).
मणिकंदन यांची पीडितेला धमकी?
मणिकंदन यांनी सुरुवातीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केलं. त्यानंतर पीडितेने त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणला तर त्यांना लग्नाला नकार दिला. यावेळी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल करु असं सांगितलं असता त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या मलेशियातील कुटुंबियांनाही धमकी दिली, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. तसेच पोलिसात तक्रार केली तर पीडितेचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करु, अशीही धमकी मणिकंदन यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
2017 मध्ये मणिकंदन यांच्याशी पहिल्यांदा भेट, पीडितेचा दावा
अभिनेत्रीने आपल्या वकिलांसोबत पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या तक्रारीची एक कॉपी माध्यमांना देण्यात आली. यामध्ये पीडित अभिनेत्री आणि मणिकंदन यांच्यातील पहिल्या भेटीपासून कसे संबंध प्रस्थापित झाले याबाबत सविस्तर सांगण्यात आलं आहे.
संबंधित अभिनेत्री ही मलेशियाची आहे. तिने तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री नडोडिगल या चित्रपटात काम केल्यानंतर मलेशियाच्या पर्यटन विभागासाठी काम करत होते. या कामाच्या निमित्ताने तिचे विविध शहरांमध्ये दौरे व्हायचे. याच दौऱ्यादरम्यान तिची मणिकंदन यांच्यासोबत 2017 साली भेट झाली. यावेळी मणिकंदन यांनी मलेशियात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पीडित अभिनेत्रीशी मैत्री केली. मणिकंदन विवाहीत असूनही त्यांनी अभिनेत्रीला लग्नाची विचारणा केली. याच काळात मणिकंदन आणि अभिनेत्री चेन्नईतील बसंत नगर भागातील एकाच घरात अनेक दिवस सोबत राहिले. तसेत दोघांनी सोबत अनेक भागात प्रवास केला, असंही अभिनेत्रीने जारी केलेल्या माहितीत सांगितलं आहे.
हेही वाचा : तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून खेळच संपवला