आमच्या विरोधात जाऊ नकोस, जीवाची पर्वा नाही का? फॅशन डिझायनरला बिष्णोई गँगच्या नावाने धमकी

मुंबईतील एका फॅशन डिझायनरला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने धमकीचा फोन आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या फॅशन डिझायनरकडे 55 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.

आमच्या विरोधात जाऊ नकोस, जीवाची पर्वा नाही का? फॅशन डिझायनरला बिष्णोई गँगच्या नावाने धमकी
lawrence bishnoi
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 11:52 AM

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिष्णोई टोळीची दहशत निर्माण झाली आहे. याच गोष्टीचा फायदा उचलून आता बिष्णोई टोळीच्या नावाने धमक्या देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. माझगाव डॉक इथं राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीच्या नावाने धमकीचा फोन आला आहे. आरोपींनी त्याच्याकडे 55 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी तक्रारदार घरी असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने तो बिष्णोई टोळीतून बोलत असल्याचं सांगितलं. तसंच एका व्यक्तीचे 55 लाख रुपये परत करण्यासाठी धमकावण्यात आलं.

“तुला सात दिवसांचा वेळ देतो. आमच्या विरोधात जाऊ नकोस, कुटुंब असलेला व्यक्ती आहेस. तुला जीवाची पर्वा नाही का?,” अशी धमकी फॅशन डिझायनरला देण्यात आली. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून प्रकरण मिटवून टाक, असंही आरोपीने धमकावलंय. सुरुवातीला तक्रारदाराने या धमकीच्या फोनकडे काणाडोळा केला. पण, नुकत्याच घडलेल्या घडामोडींनंतर त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला एका परिचित व्यक्तीने दिला. त्यानुसार तक्रारदाराने शिवडी पोलिसांत तक्रार नोंदवली असून याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई सतत चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगकडून स्वीकारण्यात आली होती. जो कोणी सलमान खान आणि दाऊदची मदत करणार, त्याला आपला हिशोब तयार ठेवावा लागेल, अशी धमकीही या पोस्टद्वारे देण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर बिष्णोई गँगच्या नावाने विविध धमक्या दिल्या जात आहेत. अभिनेता सलमान खानलाही बिष्णोईच्या नावाने धमकी देण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

लॉरेन्स बिष्णोई हा फक्त गँगस्टरच नाही तर तो भारतासाठी फुटीरतावादी म्हणून काम करणाऱ्या खलिस्तानवादी संघटनांचा भागसुद्धा आहे. तो खलिस्तानवादी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा दावा करत एनआयएनं त्याच्याविरोधात युएपीए अंतर्गत खटला दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन चार्जशीट दाखल केल्या आहेत. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई हा कॅनडा आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.