वाळु माफियाकडून पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरने धडक दिल्याने पोलिस जखमी
बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यातील खामगाव (Khamgaon) येथे अवैध वाळु उपसा करत असल्याची पोलिसांनी (Police) माहिती मिळाली. त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिासांवरती वाळू माफियाकडून जीवघेणा हल्ला केला.
बीड – बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यातील खामगाव (Khamgaon) येथे अवैध वाळु उपसा करत असल्याची पोलिसांनी (Police) माहिती मिळाली. त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिासांवरती वाळू माफियाकडून जीवघेणा हल्ला केला. खामगाव येथील गोदावरी नदी पात्रात नजीक ही घटना घडली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी 6 ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई का केली म्हणून पोलीस नाईक गणेश धनवडे यांना ट्रॅक्टरने धडक दिल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे. काल झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात वाळु उपसा करणाऱ्या टोळी पोलिसांवरती अनेकदा हल्ला केला आहे. पण कालच्या प्रकरणात ट्रॅक्टरने धडक दिल्याने हे प्रकरण भयानक आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
गोदावरी पात्रात वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही बातमी खरी असल्याने पोलिसांनी तिथं अचानक धाड टाकण्याचं ठरवलं. ज्यावेळी खामगाव येथील गोदावरी नदी पात्रात पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी त्यांना तिथं सहा ट्रॅक्टर वाळू उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिस पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याचा राग आल्याने पोलीस नाईक गणेश धनवडे यांना ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. त्यावेळी पोलिसांनी धनवडे यांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल केले. सध्या पोलिस नाईक रूग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
पोलिसांवरती अनेकदा हल्ले
वाळु माफिया करणाऱ्या टोळीकडून अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांना मारणाऱ्या प्रयत्न केला आहे. त्यावर अद्याप सरकारने ठोस असा निर्णय घेतलेला नाही. जिल्हाधिकारी, तहसिलदार अशा मोठ्या अधिकाऱ्यांवरती सुध्दा महाराष्ट्रात हल्ला झाला आहे.