St. Thomas Church| नाशिकच्या सेंट थॉमस चर्चमध्ये फादरने बिशपसमोर घेतले पेटवून; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून नाशिकमधील सेंट थॉमस चर्चमध्ये एका फादरने चक्क बिशपसमोर पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

St. Thomas Church| नाशिकच्या सेंट थॉमस चर्चमध्ये फादरने बिशपसमोर घेतले पेटवून; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
जखमी फादर फादर अनंत आपटे यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 3:44 PM

नाशिकः वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून नाशिकमधील सेंट थॉमस चर्चमध्ये एका फादरने चक्क बिशपसमोर पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. आज रविवारच्या प्रार्थनेवेळी हा प्रकार घडला. या घटनेत फादर अनंत आपटे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेमुळे भाविकांना जबर धक्का बसला आहे. त्यांच्यात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

नेमके प्रकरण काय?

नाशिकमधील शालिमार या शहराच्या मध्यवस्ती असलेल्या भागात सेंट थॉमस चर्च आहे. या चर्चच्या कमेटीमध्ये अनेक विषयांवर मतभेद आहेत. त्यात कमिटीने फादर अनंत आपटे यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. त्यांनी याबाबत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे कोणीही ऐकुण घेतले नाही. त्यामुळे फादर आपटे मानसिक तणावात होते. रविवारीसुद्धा त्यांनी शालिमार येथील सेंट थॉमस चर्चमध्ये उपासनेवेळी महाधर्मगुरू शरद गायकवाड यांच्यासमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यांचे काहीही ऐकुण घेतले नाही. त्यामुळे या मानसिक ताणाला कंटाळून फादर आपटे यांनी चर्चमध्येच स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. या घटनेत ते 18 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय म्हणतायत फादर?

जखमी फादर आपटे याबाबत म्हणाले की, माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे. आमचे महागुरू शरद गायकवाड यांनी माझे कुठलेही म्हणणे ऐकुण घेतले नाही. माझ्यावर कारवाई केली. माझ्या कामाला स्थगिती दिली. खोट्या लोकांचे ऐकले. सेंट थॉमस चर्चची कमिटी आणि डॉ. मोरे यांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप लावले. माझ्यावर दडपण आणले. माझा मानसिक छळ केला. गेल्या दोन वर्षांपासून ते मला अनेक प्रकार त्रास देते होते. या सगळ्या गोष्टी आमचे महागुरू शरद गायकवाड यांना वेळोवेळी भेटून मी त्यांच्या कानावर घातल्या. त्यांनी मला न्याय दिला नाही. आज ते सेंट थॉमस चर्चमध्ये आलेले असताना मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारणा केली. ते म्हणाले तुला काय करायचे ते करून घे. या छळाला कंटाळून मी चर्चमध्ये आत्मदहन केले. माझे पाय जळाले आहेत. माझी प्रकृतीही ठीक नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेत ते 18 टक्के भाजल्याचे समजते.

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष?

सेंट थॉमस चर्चमध्ये चक्क उपासनेवेळी हा प्रकार प्रकार घडला. त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड दहशतीचे आणि भीतीचे वातावरण आहे. प्रभू येशूची प्रेमाची शिकवण आहे. ते आपल्या भक्तांचे लाखो अपराध पोटात घालतात. अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक प्रभू येशूच्या चरणी येत आपल्या अपराधाची कबुली देऊन चांगल्या मार्गाला लागतात. मात्र, येथे एका फादरचे म्हणणे जर महाधर्मगुरू आणि कमिटी ऐकूण घेत नसेल, तर इतर भाविकांचे आणि सामान्यांचे काय, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. दरम्यान, याप्रकरणी पोलीस काय पावले उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.

इतर बातम्याः

Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर युवासेनेचे शक्तीप्रदर्शन; नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन, 2 हजार पदाधिकारी येणार

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.