अजब गजब ! मुलीचे अपहरण झाले म्हणून वडिलांची पोलिसात धाव; लेक म्हणते त्रास देऊ नका ‘गॉट मॅरिड’

बिहारमधील हाजीपूर येथे एका तरुणीच्या वडिलांनी मुलीचे अपहरण झाल्याची पोलिसात तक्रार दिलीय. मात्र सध्या याच अपहरण (Abduction) झालेल्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ही मुलगी माझे अपहरण झाले नसून मी आता लग्न केले आहे. पप्पा मला त्रास देऊ नका असे ही मुलगी म्हणत आहे.

अजब गजब ! मुलीचे अपहरण झाले म्हणून वडिलांची पोलिसात धाव; लेक म्हणते त्रास देऊ नका 'गॉट मॅरिड'
छत्तीसगडमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 11:54 AM

पाटणा : आजकाल महिलांवरील अत्याचार (Crime Against Women) वाढले आहेत. अपहरण करुन महिलांवर लैंगिक अत्याचार करण्याच्या घटना तर रोजच घडतात. असा परिस्थितीत महिलांनी सजग असणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते. मात्र सध्या अपहरण प्रकरणातील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. बिहारमधील हाजीपूर येथे एका तरुणीच्या वडिलांनी मुलीचे अपहरण झाल्याची पोलिसात तक्रार दिलीय. मात्र सध्या याच अपहरण (Abduction) झालेल्या तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ही मुलगी माझे अपहरण झाले नसून मी आता लग्न केले आहे. पप्पा मला त्रास देऊ नका असे म्हणत आहे. तसेच तिने पोलिसांकडे मदतदेखील मागितली आहे. या अजब परिस्थितीमुळे पोलीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नेमका प्रकार काय आहे ? नेमकं काय घडलं ?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार एका व्यक्तीने गोरौल पोलिसांत आपल्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र आता अपहरण झालेल्या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी माझे अपहरण झाले नसल्याचे सांगत आहे. तसेच माझ्या वडिलांनी मला त्रास देऊ नये असे म्हणत या तरुणीने पोलिसांकडे मदतदेखील मागितली आहे.

मुलगी म्हणते गॉट मॅरिड

मुलगी घरातून गायब झाल्यानंतर तिच्या परिवारातील सदस्य घाबरले होते. त्यांनी मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसात धाव घेतली होती. मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर गायब असलेल्या तरुणीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गॉट मॅरिड असे स्टेटस दिसले. त्यानंतर या तरुणीने एक व्हिडीओ अपलोड करुन लग्न केल्याची माहिती दिली. तसेच मी एक सज्ञान असून माझ्या मर्जीनेच मी लग्न केलं आहे, असं तरुणी व्हिडीओत सांगताना दिसतेय. विशेष म्हणजे या मुलीने वडील त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिच्यासोबत एक तरुण दिसतोय. याच तरुणासोतब तिने लग्न केले आहे.

पोलीस काय भूमिका घेणार याकडे लक्ष 

दरम्यान, एकीकडे वडिलांनी मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. तर दुसरीकडे खुद्द मुलगीच माझे अपहरण झाले नसून मी लग्न केले आहे, असे व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. अशा विचित्र परिस्थितीमुळे ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तर पोलीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरत आहे.

इतर बातम्या :

‘Srivalli’वर रील्स पाहिल्या असतील, आता भजन ऐका तेही मराठमोळ्या स्टाइलमध्ये; Video Viral

Wine | सरकार म्हणतं वाईन दारू नाही, मग वाईन पिऊन गाडी चालवल्यास दंड होणार ? मुंबई पोलीस म्हणाले…

Pimpri Chinchwad Crime|विनयभंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या 72 तासात दिली 18 महिन्यांची शिक्षा

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.